BSF जवानाच्या प्रसंगावधानतेमुळे हृद्यविकाराचा त्रास होत असलेल्या जवानांचे वाचले प्राण; ट्विटरवर कौतुकाचा वर्षाव

लोकेश्वर खजुरियाच्या बाजूला बसलेल्या सहप्रवाशाला अचानक प्रवासादरम्यान छातीत दुखायला लागलं, श्वास घेताना त्रास व्हायला लागला. यानंतर काही काळ विमानात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली मात्र त्यावेळेसही प्रसंगावधान ठेवत बीएसएफ जवानाने सहप्रवाशाला मदत केली

BSF Jawan (Photo Credits: Twitter)

भारतीय लष्करातील कोणतीच व्यक्ती कधीही सुट्टीवर नसते. सीमेवर आणि देशातही भारतीयांच्या संरक्षणासाठी ते सज्ज असतात. नुकतीच विमानप्रवासात एका BSF जवानाने सहप्रवाशाला मदत करत तात्काळ वैद्यकीय सेवा मिळवून देण्यास मदत केली. BSF ने देखील ट्विटर अकाऊंटवरून त्याचं कौतुक करत एक प्रहरी कधीच सुट्टीवर नसतो अशा आशयाचं कौतुक करणारं एक ट्वीट नुकतेच शेअर करण्यात आलं आहे.

विमानात BSF जवान डॉ. लोकेश्वर खजुरियाच्या बाजूला बसलेल्या सहप्रवाशाला अचानक प्रवासादरम्यान छातीत दुखायला लागलं, श्वास घेताना त्रास व्हायला लागला. यानंतर काही काळ विमानात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली मात्र त्यावेळेसही प्रसंगावधान ठेवत बीएसएफ जवानाने सहप्रवाशाला मदत केली.

सोशल मीडियातही डॉ. खजुरिया या जवानाच्या मदतीचं कौतुक होत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif