British F-35 Fighter Jet Emergency Landing: ब्रिटिश नौदलाच्या लढाऊ विमानाचे केरळच्या तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग
यूके नौदलाच्या लढाऊ विमानाचे इंधन कमी झाल्याने तिरुवनंतपुरममध्ये विमानतळावर आपत्कालीन लँडिंगला परवानगी देण्यात आली. यूके नौदलाचे जहाज तिरुवनंतपुरमपासून 100 नॉटिकल मैल अंतरावर होते.
British F-35 Fighter Jet Emergency Landing: केरळमधील तिरुवनंतपुरम विमानतळावर (Thiruvananthapuram International Airport) एका लढाऊ विमानाचे आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले आहे. हे लढाऊ विमान यूके नौदलाचे आहे. यूके नौदलाच्या लढाऊ विमानाचे इंधन कमी झाल्याने तिरुवनंतपुरममध्ये विमानतळावर आपत्कालीन लँडिंगला परवानगी देण्यात आली आहे. यूके नौदलाचे जहाज तिरुवनंतपुरमपासून 100 नॉटिकल मैल अंतरावर होते. शनिवारी, F35 लढाऊ विमानाने प्रशिक्षण उड्डाण केले. खराब हवामानामुळे जहाजात लँडिंग यशस्वी झाले नाही. अनेक प्रयत्नांमुळे विमानाचे इंधन कमी झाले.
यानंतर, प्राधिकरणाच्या परवानगीने, शनिवारी रात्री 9 वाजता लढाऊ विमानाला तिरुवनंतपुरम विमानतळावर उतरण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर यूके नौदलाच्या लढाऊ विमानाने यशस्वी लँडिंग करून सुटकेचा नि:श्वास सोडला. (हेही वाचा - Kedarnath Helicopter Crash: केदारनाथ मंदिराजवळ खराब दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर अपघात; सर्व 7 जणांचा मृत्यू)
ब्रिटिश नौदलाच्या लढाऊ विमानाचे तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग -
दरम्यान, अधिकृत सूत्रांनी सांगितले की, सर्व कायदेशीर चौकशीनंतरच या लढाऊ विमानाला इंधन भरण्याची आणि पुन्हा उड्डाण करण्याची परवानगी दिली जाईल. सध्या, हे लढाऊ विमान देशांतर्गत विमानतळाच्या फ्लाइट हँगरमध्ये ठेवण्यात आले आहे.
भारतीय आणि ब्रिटनच्या नौदलाचा युद्ध सराव
ब्रिटिश आणि भारतीय नौदलाचा संयुक्त युद्ध सराव 9 आणि 10 जून रोजी उत्तर अरबी समुद्रात झाला. या युद्ध सरावात ब्रिटनच्या नौदलाचे F35 लढाऊ विमानही सहभागी झाले होते.