IndiGo Flight Receives Bomb Threat: अहमदाबादहून आलेल्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी; अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू

या घटनेची माहिती मिळताच, विमानाची कसून सुरक्षा तपासणी करण्यासाठी विमान विमानतळाच्या आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. तथापि, विमानातील सर्व 192 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

Indigo Flight (PC - Wikimedia Commons)

IndiGo Flight Receives Bomb Threat: अहमदाबादहून आलेल्या इंडिगोच्या विमानाला (IndiGo Flight) बुधवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास बॉम्बची धमकी (Bomb Threat) मिळाली. विमान पाटण्यातील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय (जेपीएनआय) विमानतळावर उतरल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच, विमानाची कसून सुरक्षा तपासणी करण्यासाठी विमान विमानतळाच्या आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. तथापि, विमानातील सर्व 192 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

विमान पाटण्यामध्ये लँड झाल्यानंतर इंडिगोच्या स्टेशन मॅनेजर शालिनी यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली होती. एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ला पाठवण्यात आलेल्या संदेशानुसार, या मेसेजमध्ये रुमालाच्या टिश्यूवर बॉम्ब असा शब्द लिहिलेला होता. त्यानंतर यासंदर्भात तात्काळ सीआयएसएफला सतर्क करण्यात आले. (हेही वाचा - IndiGo च्या Chennai-Kolkata विमानात टेक ऑफपूर्वी प्रवाशाचा मृत्यू)

Patna, Bihar: A bomb threat was reported on an IndiGo flight from Ahmedabad to Patna. Upon landing, the aircraft and Patna airport were thoroughly searched by the bomb disposal and dog squads. The threat was later confirmed to be a hoax. pic.twitter.com/0m4222nLF7

दरम्यान, एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) ने प्रशासन आणि पोलिसांना कळवल्यानंतर, विमानतळ अधिकारी, सुरक्षा, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी बॉम्बच्या धमकीचा आढावा घेतला. विमानाला बॉम्बने धमकी देण्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वी अनेक वेळा विमानतळ किंवा विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळालेली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement