Bomb Explodes During Training Exercise In Bikaner: बिकानेर फील्ड फायरिंग रेंजमध्ये तोफांच्या सराव दरम्यान बॉम्बचा स्फोट; 2 जवानांचा मृत्यू, एक जखमी

यामध्ये एका सार्जंट आणि एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. शहीद जवानांपैकी एक दौसा (राजस्थान) तर दुसरा उत्तर प्रदेशचा आहे. तथापी, या घटनेत एक कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला असून त्याला हेलिकॉप्टरने चंदीगडला पाठवण्यात आले आहे.

Bomb Blast प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - फेसबुक)

Bomb Explodes During Training Exercise In Bikaner: बिकानेर (Bikaner) च्या महाजन फील्ड फायरिंग रेंज (Mahajan Firing Range) मध्ये युद्धाअभ्यासादरम्यान पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. येथे युद्धाअभ्यास सुरू असताना झालेल्या बॉम्बस्फोटात (Bomb Blast) दोन जवानांचा मृत्यू झाला. तर एक जवान गंभीर जखमी झाला. जखमी जवानाला हेलिकॉप्टरने चंदीगड येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

लुंकरांसारचे सीओ नरेंद्र पुनिया यांनी सांगितले की, लोडिंग करताना तोफेमधील कवचाचा स्फोट झाला. यामध्ये एका सार्जंट आणि एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. शहीद जवानांपैकी एक दौसा (राजस्थान) तर दुसरा उत्तर प्रदेशचा आहे. तथापी, या घटनेत एक कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला असून त्याला हेलिकॉप्टरने चंदीगडला पाठवण्यात आले आहे. (हेही वाचा -Himachal Pradesh Phone Blast: चार्जिंगवर असताना फोन वापरत होती युवती; इंटरनेट सुरु करताच झाला मोठा स्फोट, उपचारादरम्यान मृत्यू)

तीन दिवसांत दुसरा अपघात -

बिकानेर येथील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये तीन दिवसांत युद्धाअभ्यादरम्यान घडलेला हा दुसरा अपघात आहे. तीन दिवसांपूर्वी येथे एका जवानाचा मृत्यू झाला होता. जवान टोइंग वाहनाला तोफ जोडत असताना तोफ घसरली आणि या दुर्घटनेत त्याचा चिरडून मृत्यू झाला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif