Mumbai Water Cut: सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरी भागात 19 ते 20 सप्टेंबर दरम्यान पाणी कपात; पुरेसा पाणीसाठा ठेवण्याचा महानगरपालिकेचा सल्ला

जलवाहिन्यांच्या देखभालीच्या कामासाठी विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरी भागात 19 ते 20 सप्टेंबर दरम्यान, तात्पुरता पाणी पुरवठा खंडित केला जाणार आहे.

Water Cut | Image Used For representational Purpose | Pixabay.com

Mumbai Water Cut: बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) जलवाहिन्यांच्या देखभालीचे काम करण्यात येत आहे. परिणामी सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरी भागात काही काळासाठी पाणी पुरवठा खंडित केला जाणार आहे. 19-20 सप्टेंबर रोजी अठरा तासांसाठी पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. गुरुवारी, 19 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून शुक्रवार, 20 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (हेही वाचा: Mumbai Airport: मुंबई विमानतळावर चोरी, चक्क 10 लाख रुपयांचा चेक चोरला, गुन्हा दाखल)

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेरावली जलाशय-२ येथे ७५० मिलीमीटर व्यासाच्या पार्ले वेसावे (वर्सोवा) निगमवाहिनीवरील चार झडपा बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे या कालावधीदरम्यान अंधेरी व जोगेश्वरीचा समावेश असलेल्या के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. देखभालीचे काम पूर्ण झाल्यानंतर नियमित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल.

दरम्यान, पाणी पुरवठा सुरळीत झाला तरी बीएमसीकडून नागरिकांना सल्ला जारी करण्यात आला आहे. आरोग्य सुरक्षेचा उपाय म्हणून, पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर ४ ते ५ दिवस पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. व्हॉल्व्ह बदलल्याने पाण्याच्या गुणवत्तेवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो, असे बीएमसीने म्हटले आहे. आरोग्याबाबत संभाव्य धोका टाळण्यासाठी, रहिवाशांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, असे महानगरपालिकेने म्हटले.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif