अमृतसरमधील निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला; तिघांचा मृत्यू, दहाजण जखमी
अमृतसरमधील राजासांसी परिसरात आदिवाल गावात निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला.
अमृतसरमधील राजासांसी परिसरात आदिवाल गावात निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. रविवारी दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यामुळे झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला आहे तर दहाजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
निरंकारी भवनामध्ये दर रविवारी सत्संगचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे आजही सत्संग सुरु असताना दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने बॉम्ब फेकला. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला.
स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. लोकांची पळापळ सुरु झाली. पोलिस घटनास्थळी पोहचले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसंच हल्लेखोरांचाही शोध सुरु आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Air India Flight Cancellations: सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! एअर इंडियाची उड्डाणे रद्द; म्मू, लेह, अमृतसर आणि इतर शहरांसह आठ ठिकाणांचा समावेश
Airports Closes For Civilian Flights: भारतामध्ये 14 मे पर्यंत 32 विमानतळ बंद आणि अनेक उड्डाण मार्ग निलंबित; जाणून घ्या यादी
Advertisement
Advertisement
Advertisement