भाजपा Make In India म्हणते मात्र प्रत्यक्षात चीनकडूनच खरेदी करते- राहुल गांधी
2016 मध्ये ती 16% , 2017 मध्ये 17% आणि 2018 मध्ये ती 18% इतकी झाली, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आ
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या मेक इन इंडिया (Make In India) या योजनेवर काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तसेच, स्वदेशीच्या मुद्द्यावरुन भाजपवरही टीका केली आहे. भाजपा (BJP) मेक इन इंडिया म्हणते आणि खेरदी मात्र चीनकडून करते असा आरोप करत राहुल गांधी यांनी मंगळवारी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राहुल यांनी एक ग्राफिक्स शेअर करुन म्हटले आहे की, भारतात होणाऱ्या चीनकडील आयातीचे प्रमाण हे 2014 नंतर मोठ्या प्रमाणावर वाढले. यूपीए आणि एनडीए सरकारची तुलना करत राहुल यांनी दोन्ही सरकारमधील आयातीची आकडेवारी दिली आहे. सोबत वास्तवता खोटे बोलत नाही, असेही म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या ग्राफीक्समध्ये म्हटले आहे की, 2008 ते 2014 या काळात चीनमधून होणाऱ्या आयातिचे प्रमाण 14% इतके होते. तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात चीनमधून होणारी आयात 18% वाढली आहे. ग्राफिक्समध्ये असेही दाखवले आहे की, 2008 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात चीनमधून होणाऱ्या आयातिचे प्रमाण 12% इतके होते. जे 2012 मध्ये वाढून 14 टक्के झाले मात्र, पुन्हा 2014 मध्ये त्यात घट होऊन ते 13% इतके झाले. (हेही वाचा, राहुल गांधी यांची पुन्हा पीएम नरेंद्र मोदींवर टीका- 'पँगाँग तलावाजवळ चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केला', शेअर केले सॅटेलाइट फोटो (Watch Video))
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात चीनमधून होणारी आयात 2015 मध्ये 13% वरुन वाढून ती 14% इतकी झाली. 2016 मध्ये ती 16% , 2017 मध्ये 17% आणि 2018 मध्ये ती 18% इतकी झाली, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
लद्दाख प्रदेशातील गलवान खोऱ्यात चीनने भारताची कुरापत काढली आहे. या वेळी दोन्ही देशांच्या लष्करामध्ये झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यामुळे देशभरात चीन विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकावा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर जोर धरु लागली आहे.