Saumitra Khan On Sujata Mondal: पक्ष सोडून बायको थेट TMC मध्ये दाखल, नवऱ्याला धक्का; भाजप खासदार सौमित्र खान घेणार घटस्फोट

त्यानंतर अल्पावधीतच अभिषेक यांच्य पत्नी सुजाता मंडल खान यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे अभिषेक यांना चांगलाच धक्का बसला आहे.

Sujata Mondal, Saumitra Khan | (Photo Credits: Facebook, Archived, edited, symbolic images))

विधानसभा निवडणूक 2121 (West Bengal Assembly Election 2021) च्या पर्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक नेते गळाला लावत असलेल्या भाजपला (BJP) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी हळूच धक्का दिला आहे. भाजप खासदार सौमित्र खान (Saumitra Khan) यांच्या पत्नी सुताजा मंडल खान (Sujata Mandal Khan) यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात काल (सोमवार, 21 डिसेंबर 2020) प्रवेश केला. सुजाता यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) प्रवेशाचा त्यांचे पती आणि भाजप खासदार सौमित्र खान यांना इतका धक्का बसला की, त्यांनी थेट घटस्फोटाचीच भाषा केली आहे. सौमित्र खान हे केवळ बोलूनच थांबले नाहीत तर त्यांनी पत्नीला थेट घटस्फोटाची नोटीस पाठवल्याचीही चर्चा आहे.

खासदार सौमित्र खान यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्यावर नुकतीच जोरदार टीका केली होती. त्यानंतर अल्पावधीतच अभिषेक यांच्य पत्नी सुजाता मंडल खान यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे अभिषेक यांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाने आपले कुटुंब फोडल्याचा आरोप केला आहे. आपण लवकरच घटस्फोट घेणार आहोत, असेही अभिषेक खान यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Sharad Pawar: ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चेनंतर शरद पवार पश्चिम बंगालचा दौरा करण्याची शक्यता)

दरम्यान, सुजाता मंडल खान यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. सुजाता यांनी म्हटले आहे की, भाजप हा एक प्रचंड स्वार्थी पक्ष आहे. सत्तेला हापापलेल्या लोकांना तो पक्षात लगेच प्रवेश देतो. सत्तेला लालची लोकही तत्काळ भाजपमध्ये जातात. भाजपमध्ये कोणालाही सन्मान दिला जात नाही. सर्व भ्रष्ट आणि मलीन प्रतिमा असलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो. पक्षामध्ये सर्वात जुन्या आणि कट्टर कार्यकर्त्यांना नेहमीच डावलले जाते.

दरम्यान, सुजाता यांनी म्हटले आहे की, कुटुंब आणि राजकारण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. मी माझ्या पतीबद्दल कधीही वाईट बोलले नाही. पक्ष बदलण्यात नात्याचा संबंध येतोच कोठे. मी स्पष्टपणे सांगू इच्छिते की मी पतीबद्धल कधीही वाईट बोलले नाही. ते त्यांच्या आयुष्यात खूष आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूश राहावे, प्रगती करावी. त्यांनी मला पत्नी मानूदेत किंवा नाही मी मात्र त्यांना पतीच मानते. मी माझ्या भांगेत त्यांचेच कुंकू लावते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif