ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या मातोश्री माधवी राजे कोरोना सदृश्य लक्षणांमुळे दिल्लीच्या रूग्णालयात अॅडमिट
भाजपा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia)आणि त्यांच्या मातोश्री माधवी राजे (Madhavi Raje)यांना कोरोना सदृश्य लक्षणांमुळे दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे
भाजपा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) आणि त्यांच्या मातोश्री माधवी राजे (Madhavi Raje)यांना कोरोना सदृश्य लक्षणांमुळे दिल्लीच्या मॅक्स सुपर स्पेशॅलिटी (Max Super Speciality Hospital) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती IANS या वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान त्यांना घशात खवखव आणि ताप आहे. ही दोन्ही लक्षणं कोरोनाची असल्याने त्यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 29,943 जण कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 11,357 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 17,712 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील ताप आणि खोकला या लक्षणांमुळे आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर आज त्यांचीदेखील कोव्हिड टेस्ट घेण्यात आली आहे. आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी राज्यात कम्युनिटी स्प्रेड झाला नसल्याचं म्हटलं आहे.
IANS Tweet
देशामध्ये दिवसागणिक कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. देशात मागील 24 तासामध्ये 9983 नव्या कोरोना रुग्णांची आणि 206 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार आता देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 2 लाख 56 हजार 611 वर पोहचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, यापैकी 1,25,381 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आजवर 7135 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. याशिवाय 1,24,095 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे समजत आहे.