Kanwar Lal Meena: भाजपचे माजी आमदार कंवरलाल मीणा यांना तीन वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा

तत्कालीन आमदार कंवरलाल मीणा आणि अकलेर प्रांताचे तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी रामनिवास मेहता यांच्यात काही कारणाेन बाचाबाची झाली. या वेळी कंवरलाल मीना यांनी रामनिवास मेहता यांच्यावर रिवॉल्वर (Revolver) रोखले. तसेच, अभद्र भाषा वापरली. हे प्रकरण कोर्टात गेले.

Kanwar Lal Meena | (Photo Credits: Facebook)

राजस्थान (Rajasthan ) राज्यातील भाजपच्या एका माजी आमदाराला अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. कंवरलाल मीणा (Kanwarlal Meena) असे या माजी आमदाराचे नाव आहे. कंवरलाल मनी यांना तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा (Jail and Fine) ठोठावण्यात आली आहे. अकलेर प्रांताचे तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी रामनिवास मेहता यांच्यावर रिवॉल्वर (Revolver) रोखणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा कंवरलाल मणी यांच्यावर आरोप होता. हे प्रकरण साधारण 15 वर्षांपेक्षाही जुने आहे. इतक्या वर्षांनंतर या खटल्याचा निकाल न्यायालयाने दिला. जिल्हा सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय फिरवत माजी आमदाराला दोषी ठरवले आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना साधारण 2005 मधील आहे. तत्कालीन आमदार कंवरलाल मीणा आणि अकलेर प्रांताचे तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी रामनिवास मेहता यांच्यात काही कारणाेन बाचाबाची झाली. या वेळी कंवरलाल मीना यांनी रामनिवास मेहता यांच्यावर रिवॉल्वर (Revolver) रोखले. तसेच, अभद्र भाषा वापरली. हे प्रकरण कोर्टात गेले. (हेही वाचा, Rajasthan ULB Election Results 2020: कमळावर पडला हात भारी, राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसची सरशी, भाजपची पिछेहाट)

दरम्यान, स्थानिक कोर्टाने सबळ पुराव्या अभावी माजी आमदार कंवरलाल मीणा यांची 2018 मध्ये निर्दोष मुक्तता केली. याला रामनिवास मेहता यांनी वरच्या कोर्टात आव्हान दिले. वरच्या कोर्टाने खालच्या कोर्टाचा निर्णय फिरवत कंवरलाल मीणा यांना दोषी ठरवत शिक्षा दिली.

जिल्हा सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय फिरतवत कंवरलाल मीणा यांना सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल 2 वर्षांची सजा आणि दंड तसेच जीवे मारल्याची धमकी दिल्याबद्दल(पीडीपीपी कायदा) तुरुंगवास आणि दंड अशी एकूण तीन वर्षांची सजा सुनावली. कोर्टाने शिक्षा ठोठावताच कंवरलाल मीणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना तुरुंगात पाठवले जाणार आहे.