Bird Hit Air India's Delhi-Pune Flight: दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला धडकला पक्षी; लँडिंगनंतर परतीचे उड्डाण रद्द
एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की विमान सुरक्षितपणे उतरले असून पुण्यात उतरल्यानंतर पक्षी आदळल्याची घटना उघडकीस आली. एअर इंडियाने म्हटले आहे की, विमान थांबवण्यात आले असून अभियांत्रिकी पथक त्याची कसून चौकशी करत आहे.
Bird Hit Air India's Delhi-Pune Flight: दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला (Air India Flight) पक्षी धडकला (Bird Hit). त्यामुळे एअरलाइनला या उड्डाणाचा परतीचा प्रवास रद्द करावा लागला. विशेष म्हणजे पक्षी विमानाला धडकला तेव्हा पायलटला याची माहिती नव्हती. तथापि, लँडिंगनंतरच्या तपासात पक्षी धडकल्याचे उघडकीस आले. त्यानंतर विमानाचा परतीचा प्रवास रद्द करण्यात आला.
एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की विमान सुरक्षितपणे उतरले असून पुण्यात उतरल्यानंतर पक्षी आदळल्याची घटना उघडकीस आली. एअर इंडियाने म्हटले आहे की, विमान थांबवण्यात आले असून अभियांत्रिकी पथक त्याची कसून चौकशी करत आहे. (हेही वाचा -Technical Snag In IndiGo Flight: एअर इंडियानंतर आता इंडिगोच्या विमानातही तांत्रिक बिघाड; मदुराईला जाणारे विमान चेन्नईला परतले)
दरम्यान, अडकलेल्या प्रवाशांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याचेही एअरलाइनने म्हटले आहे. प्रवाशांना तिकिटे रद्द करण्याचा किंवा पुन्हा बुक करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे कंपनीने सांगितले आहे. जर एखाद्या प्रवाशाला आता प्रवास करायचा नसेल तर त्याला परतफेड देखील देण्यात येत आहे. यासोबतच प्रवाशांना दिल्लीला नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. (हेही वाचा - Air India कडून 16 इंटरनॅशनल रूटस वर 15 जुलै पर्यंत विमानं सेवा तात्पुरती कमी, 3 ठिकाणची विमान रद्द; पहा यादी)
एअर इंडियाचे 8 उड्डाण रद्द -
दरम्यान, अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानाला उड्डाणानंतर काही सेकंदातच अपघात झाला. विमान अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या अपघातानंतर एअर इंडियाने त्यांच्या सर्व विमानांची तपासणी सुरू केली आहे. यामुळे शुक्रवारी एअर इंडियाच्या आठ उड्डाणे रद्द करण्यात आली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)