Bihar: धक्कादायक! अल्पवयीन मूक-बधीर मुलीवर सामुहिक बलात्कार; ओळख पटू नये म्हणून फोडले डोळे

यासह नराधमांनी बलात्कारानंतर तिचे दोन्ही डोळे तीक्ष्ण वस्तूने फोडले आहेत. मुलीला आपली ओळख पटवता येऊ नये म्हणून हे कृत्य करण्यात आले आहे. यामध्ये पीडितेचा एक डोळा जवळजवळ निकामी झाला आहे, तर दुसरा डोळाही गंभीर जखमी झाला आहे

Rape | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

बिहारच्या (Bihar) मधुबनी (Madhubani) येथे सामुहिक बलात्काराची (Gang Rape) एक भीषण घटना घडली आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. हरलाखी पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात एका अल्पवयीन मुक-बधीर (Deaf and Mute) मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. यासह नराधमांनी बलात्कारानंतर तिचे दोन्ही डोळे तीक्ष्ण वस्तूने फोडले आहेत. मुलीला आपली ओळख पटवता येऊ नये म्हणून हे कृत्य करण्यात आले आहे. यामध्ये पीडितेचा एक डोळा जवळजवळ निकामी झाला आहे, तर दुसरा डोळाही गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी 12 जानेवारी, 2021 ची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी शेळीसाठी झाडपाला आणायला थूमहानी नदीजवळ गेली होती. तिथे आधीपासून असलेल्या एका तरूणाने या मुलीवर बलात्कार केला. या मुलीने त्याला विरोध केला असता तिच्या डोळ्यावर शेतात पडलेल्या धारदार वस्तूने हल्ला केला. या घटनेनंतर मुलीला तसेच रक्ताच्या थारोळ्यात टाकून तो मुलगा पळून गेला. काही गावकरी शेतात गहू पाहण्यासाठी आले असता त्यांनी बेशुद्ध अवस्थेत ही मुलगी दिसली.

मुलीला प्रथम पीएचसी आणि नंतर सदर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी चांगल्या उपचारासाठी डीएमसीएच येथे रेफर केले. इमर्जन्सी वॉर्डमध्ये तैनात असलेल्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, मुलीवर लैंगिक अत्याचार झाले असून तिच्या दोन्ही डोळ्यांना दुखापत झाली आहे. या घटनेमध्ये एका पेक्षा अधिक लोक सामील असावेत असा गावकऱ्यांचा अंदाज आहे. पीडित मुलीचे कुटुंबीय गरीब शेतकरी आहेत. या घटनेनंतर त्याची अवस्थाही गंभीर आहे. आरोपींना फाशी देण्यात यावी आणि पीडित मुलीला अधिक चांगल्या उपचारासाठी सरकारने मदत करावी असे त्यांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: वाराणसीहून औरंगाबादमध्ये आलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार)

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की याबाबत त्वरित कारवाई करत त्यांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. हरलाखी पोलीस ठाण्याचे प्रेम लाल पासवान यांनी याची पुष्टी केली आहे. पीडिता व तिच्या कुटूंबाच्या विधानाच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाईल, असे एसएचओने सांगितले. याबाबत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.