Shocking! सुनेचा जडला सासऱ्यावर जीव; दोन मुलांना मागे सोडून दोघेही गेले पळून

याबाबत कुंदनने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस स्टेशनमधून परत आल्यानंतर गावातील लोक याबाबत चर्चा करू लागले तसेच टोमणेदेखील मारू लागले. या सर्व त्रासाला कंटाळून कुंदनने विष प्राशन केले

Shocking! सुनेचा जडला सासऱ्यावर जीव; दोन मुलांना मागे सोडून दोघेही गेले पळून
Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

बिहारच्या (Bihar) पाटणामधील (Patna) परसा बाजार पोलीस ठाण्याच्या कुरथौल गावात एक विचित्र घटना समोर आली आहे. गावातील दोन मुलांची आई तिच्या सासऱ्यासह बुधवारी फरार झाली. महत्वाचे म्हणजे ही महिला आपल्या दोन मुलांना मागे सोडून सासऱ्यासोबत पळून गेली आहे. पत्नीच्या अशा कृत्यामुळे नाराज झालेल्या पतीने गुरुवारी परसा बाजार पोलीस ठाण्यात जाऊन मदतीची याचना केली. या प्रकरणी पोलीस काही कारवाई करतील त्याआधीच, पोलीस ठाण्यातून परतलेल्या पतीने शुक्रवारी विष प्राशन केले.

त्यानंतर ताबडतोब कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी या तरुणाचा मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या महिलेचे संबंध तिच्या चुलत सासऱ्यांच्यासोबत होते. पतीने या गोष्टीचा विरोध केला मात्र सासऱ्याने महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. तीन दिवसांपूर्वी पत्नी आपल्या दोन मुलांना सोडून सासरे जसवंत सिंग यांच्यासोबत पळून गेली. या घटनेनंतर त्रस्त पतीने पोलीस ठाण्यात जाऊन मदतीची याचना केली, मात्र पोलीस काही करण्याच्या आधीच पतीने पोलीस ठाण्यातून परतल्यानंतर विष प्राशन केले.

घटनेच्या संदर्भात, मृताच्या नातेवाईकांनी सांगितले की, कुंदन सिंग त्याच्या वडिलोपार्जित घरी दोन मुले आणि पत्नी कुर्तुलसह राहत होता. कुंदनचे गावातील काका जसवंत सिंह याचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. यादरम्यान कुंदनच्या पत्नीचे त्याचे काका जसवंत सिंग यांच्याशी प्रेमसंबंध सुरू झाले. दोघांच्या नात्याची संपूर्ण गावात चर्चा होऊ लागली. आपल्या काकाच्या पत्नीसोबतच्या अवैध संबंधांमुळे तो खूप नाराज होता. त्यानंतर अचानक ही महिला आपल्या चुलत सासऱ्यासोबत पळून गेली.

याबाबत कुंदनने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस स्टेशनमधून परत आल्यानंतर गावातील लोक याबाबत चर्चा करू लागले तसेच टोमणेदेखील मारू लागले. या सर्व त्रासाला कंटाळून कुंदनने विष प्राशन केले. पुढे कुंदनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात पारसा बाजार पोलीस स्टेशनचे प्रभारी माशूक अली यांनी सांगितले की, कुंदनच्या जबानीवरून जसवंत सिंह आणि पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 22, 2022 09:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).