Bihar Shocker: बिहारमध्ये महिलेला हुंडा म्हणून तिची किडनी पतीला दान करण्यास सांगितले; तक्रार दाखल, तपास सुरु
अहवालानुसार, महिलेचे 2021 मध्ये लग्न झाले होते. सुरुवातीला सर्व काही ठीक होते, परंतु नंतर सासरच्या मंडळींनी तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. त्यांनी तिला माहेरहून मोटरसायकल, रोख रक्कम आणि दागिने आणण्याची मागणी केली.
बिहारच्या (Bihar) मुझफ्फरपूरमध्ये (Muzaffarpur) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऐकायला अविश्वसनीय वाटत असले तरी, बिहारमधील एका महिलेला तिच्या सासरच्यांनी हुंड्यात (Dowry) बाईक, रोख रक्कम आणि दागिने आणता येत नसल्यास चक्क तिची किडनी (Kidney) तिच्या पतीला दान करण्यास सांगितले. मुझफ्फरपूर येथे सासरच्यांनी सुनेला आपल्या मुलासाठी हुंडा म्हणून तिची किडनी मागितल्याची विचित्र घटना घडली आहे. याप्रकरणी दिप्ती नावाच्या महिलेने मुझफ्फरपूरमधील महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अहवालानुसार, महिलेचे 2021 मध्ये लग्न झाले होते. सुरुवातीला सर्व काही ठीक होते, परंतु नंतर सासरच्या मंडळींनी तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. त्यांनी तिला माहेरहून मोटरसायकल, रोख रक्कम आणि दागिने आणण्याची मागणी केली. दीप्तीच्या कुटुंबाने या मागण्या पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवली. त्यांनतर तिला तिच्या आजारी पतीसाठी किडनी देण्यास सांगण्यात आले. या प्रकरणाने हुंडा प्रथेच्या क्रूरतेवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे, आणि याबाबत समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
2023 मध्ये दीप्तीला तिच्या पतीला किडनीच्या आजाराने ग्रासले असल्याचे समजले. यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी तिला हुंड्याऐवजी आपली एक किडनी पतीला दान करण्यास सांगितले. सुरुवातीला तिला वाटले की ही मागणी गंमतीने केली गेली आहे, परंतु सासरच्या मंडळींनी तिच्यावर दबाव वाढवला. तिने किडनी दान करण्यास नकार दिला, तेव्हा तिला मारहाण करण्यात आली आणि घरातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ती आपल्या माहेरी गेली आणि मुझफ्फरपूरच्या महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (हेही वाचा: Indore Couple Missing Case: शिलॉंगला हनिमूनसाठी जाऊन गायब झालेल्या जोडप्यामध्ये पती Raja Raghuvanshi च्या खूनाचा संशय Sonam Raghuvanshi वर; 'सुपारी दिल्याच्या' आरोपाखाली अटक)
पोलिसांनी दोन्ही बाजूंमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. दीप्तीने तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्याचा आग्रह धरला पण तो मान्य झाला नाही. महिला पोलीस ठाण्यात दीप्तीच्या तक्रारीवरून तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणात तिच्या पतीसह सासरच्या चार सदस्यांना आरोपी करण्यात आले आहे. मुझफ्फरपूरच्या महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे, आणि लवकरच आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 5189 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

