Bihar Shocker: भूल न देता महिलांवर अमानुषपणे नसबंदी शस्त्रक्रिया; हात-पाय बांधले, तोंडही दाबले
एका महिलेच्या नसबंदी ऑपरेशनसाठी सरकार या एनजीओला 2170 रुपये देत आहे. म्हणूनच नसबंदीची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने पुरेशी वैद्यकीय व्यवस्था आणि खबरदारी न घेता ऑपरेशन्स केली जात आहेत.
बिहारमध्ये (Bihar) सरकारी रुग्णालयातील नसबंदी ऑपरेशनचे कंत्राट खासगी संस्थेला देऊन आरोग्य विभाग झोपी गेला आहे. खगरियाच्या शासकीय रुग्णालयांमध्ये शासकीय निकष व नियम धाब्यावर बसवून खासगी संस्थेकडून नसबंदीच्या कारवाईदरम्यान महिलांच्या जिवाशी खेळण्याचा खेळ सुरू आहे. यापूर्वी परबत्ता सामुदायिक आरोग्य केंद्रात एफआरएचएस या खासगी संस्थेने केलेल्या ऑपरेशन दरम्यान निष्काळजीपणा समोर आला होता. आता सोमवारी दरभंगा येथील ग्लोबल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह नावाच्या संस्थेने अलौली हॉस्पिटलमध्ये केलेल्या ऑपरेशनदरम्यान महिलांना अमानुष वागणूक दिल्याचा आरोप केला आहे.
बिहारमधील खगरिया जिल्ह्यातील अलौली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी नसबंदीचे सर्व निकष झुडकारून महिलांचे ऑपरेशन केले आहे. ऍनेस्थेसिया (Anaesthesia) किंवा वेदनाशामक इंजेक्शन न देता महिलांचे नसबंदीचे ऑपरेशन करण्यात आल्याचा महिलांचा आरोप आहे. 23 महिलांवर जनावरांप्रमाणे अशी शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या, मात्र वेदनेने ओरडणाऱ्या महिलांची अवस्था पाहून सात महिलांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आणि कसेतरी तिथून पळ काढून आपला जीव वाचवला.
शस्त्रक्रियेदरम्यान महिला वेदनेने रडत राहिल्या, तडफडत राहिल्या. आरडाओरड केल्यावर चार ते पाच जणांनी त्यांचे हातपाय पकडले, तोंड झाकले. अशाप्रकारे शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका महिलेचा व्हायरल झालेला व्हिडिओ सरकारी रुग्णालयांमध्ये एनजीओ/खाजगी संस्थेद्वारे नसबंदीच्या ऑपरेशनमध्ये होणारा अमानुष व्यवहार कथन करीत आहे. (हेही वाचा: 'पुल खुला व्हायला नको होता'; गुजरात हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून महापालिकेने स्वीकारली मोरबी पुल दुर्घटनेची जबाबदारी घेतली)
एका खाजगी संस्थेने आरोग्य विभागाच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित केल्याचे वृत्त आहे. एका महिलेच्या नसबंदी ऑपरेशनसाठी सरकार या एनजीओला 2170 रुपये देत आहे. म्हणूनच नसबंदीची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने पुरेशी वैद्यकीय व्यवस्था आणि खबरदारी न घेता ऑपरेशन्स केली जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत सिव्हिल सर्जन अमरकांत झा म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. हे का घडले? यामध्ये कोणकोणते कर्मचारी आणि डॉक्टरांचा सहभाग होता, याचा शोध घेऊन तपासानंतर कारवाई केली जाईल.