Bihar Assembly Elections 2020: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर देवेंद्र फडणीस यांची बिहार मधील भाजपच्या प्रभारी पदी नियुक्ती

Devendra Fadnavis | (Photo Credits: ANI)

Bihar Assembly Elections 2020:  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांची बुधवारी बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर भाजपच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. बिहार येथे पुढील महिन्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्या आधीच हा निर्णय भाजप पक्षाकडून घेण्यात आला आहे.(Bihar Assembly Elections 2020: सगळ्याच पक्षात इच्छुकांची बहुगर्दी, बिहार विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळविण्यासाठी अनेकांचे 'गुडघ्याला बाशिंग', प्रत्येकाची तऱ्हा निराळी)

फडणवीस यांनी असे म्हटले आहे की, बिहार मधील महागठबंधनाच्या तुलनेत भाजप पक्षाची आघाडी खुपच पुढे आहे. त्यामुळे आम्हीच निवडणुक जिंकणार असा विश्वास देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर आज फडणवीस यांची पक्षाच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आल्याची औपचारिकरित्या घोषणा करण्यात आली आहे. बिहार येथे 28 ऑक्टोंबर, नोव्हेंबर 3 आणि नोव्हेंबर, 7 या तारखांना निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणूकीचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष JD(U) भाजपचे सहयोगी आहेत.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणूकांसदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक सुद्धा बोलावण्यात आली होती. या बैठकीला देवेंद्र फडणवी, गृहमंत्री अमित शहा आणि भुपेंद्र यादव यांनी उपस्थिती लावली होती. असे बोलले जात आहे की, येत्या दोन-तीन दिवसात जागा वाटपाबद्दल निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सर्व मित्रपक्ष मिळून निवडणूक लढवणार आहेत. आज पार पडलेल्या बैठकीत जागा वाटप आणि निवडणूकीसाठी काय रणनिती असणार यावर चर्चा झाली. दरम्यान, ऑक्टोंबर मध्ये पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणूकीसाठी 71 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. परंतु अद्याप एनडीए आणि महागठबंधनातील घटक पक्षांच्या दरम्यान जागा वाटपासंदर्भात काही स्पष्ट झालेले नाही. (Bihar Assembly Elections 2020: अॅड. प्रकाश आंबेडकर किंग मेकर की एण्ट्रीपूरते मर्यादित? बिहार निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणाच्या फायद्याची?)

तर सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता बिहार मध्ये निवडणूकांचा बिगुल वाजले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून येत्या विधानसभा निवडणूकीसाठी जोरदार तयारी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु निवडणूकांसाठी सुद्धा आयोगाने काही नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसारच प्रचार रॅली आणि मतदानासंदर्भातील नियम आणि अटींचे पालन करावे असे आवाहन राजकीय पक्षांना करण्यात आले आहे.