Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभेसाठी काँग्रेसची तयारी, राहुल गांधी व्हर्च्युअल सभांमधून करणार मार्गदर्शन
या रॅलिमध्ये 5 राज्यसतरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील 2 नेते तसेच जिल्हा स्तरावरील 10 नेते या सभांमधून मार्गदर्शन करतील.
बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) लढण्यासाठी काँग्रेस (Congress) पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा प्रादुर्भाव ध्यानात घेऊन सर्वच राजकीय पक्ष अभाासी बैठकांना प्राधान्य देत आहेत. काँग्रेसनेही आगामी काळात जवळपास 100 आभासी (व्हर्च्युअल) सभांचे आयोजन केले आहे. या सभांना काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) हेसुद्धा उपस्थिती लावणार असल्याचे समजते. काँग्रेसने या सभांना ''बिहार क्रांति व्हर्च्युअल मोहीम'' असे नाव दिले आहे. या सभा 1 ते 21 सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी अजय कपूर यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.
अजय कपूर यांनी सांगितले की, 1 ते 21 सप्टेंबर या काळात होणाऱ्या 'बिहार क्रांति व्हर्च्युअल मोहीम'' सभांमध्ये पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मार्गदर्शन करणार आहेत. या रॅलिमध्ये 5 राज्यसतरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील 2 नेते तसेच जिल्हा स्तरावरील 10 नेते या सभांमधून मार्गदर्शन करतील. राज्यातील वर्तमान स्थितीवर भाष्य करत अजय कपूर यांनी म्हटले की, राज्यातील लोक परिवर्तन करु इच्छितात. जनतेला बदल हवा आहे. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: स्वबळावर नव्हे! मित्र पक्षांसोबत भाजप लढणार बिहार विधानसभा निवडणूक, संयुक्त जनता दल, लोक जनशक्ती पार्टी सोबत आघाडी)
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणूक काँग्रेस पूर्ण ताकतीने एकत्र लढेण. या निवडणूकीत जनता काँग्रेस पक्षालाच आपले जनमत देईल. बिहारच्या विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी बिहारची जनता काँग्रेसकडे पाहात असल्याचेही कपूर म्हणाले.