Bihar: दुसरीत शिकणाऱ्या 8 वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या; उजवा डोळा बाहेर काढला, बोटेही ठेचली
येथे दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. घटना जिल्ह्यातील सफियाबाद ओपी परिसरातील पूर्व टोला फरडा येथील आहे.
बिहारच्या (Bihar) मुंगेरमधून बलात्काराची (Rape) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. घटना जिल्ह्यातील सफियाबाद ओपी परिसरातील पूर्व टोला फरडा येथील आहे. या ठिकाणी गंगेमध्ये मासेमारीचे काम करणाऱ्या पवन चौधरीच्या 8 वर्षांच्या मुलीचा विकृत मृतदेह गुरुवारी सकाळी उपेंद्र यादवच्या भट्टीजवळ सापडला. मृत मुलीवर बलात्कार केल्यानंतर पुरावे लपवण्यासाठी तिचा निर्दयी पद्धतीने खून करण्यात आला.
मुलीची हत्या केल्यानंतर, क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडून तिचा उजवा डोळा बाहेर काढण्यात आला. त्याचबरोबर हाताची बोटेही चिरडली गेली. या प्रकरणी ग्रामस्थांनी सांगितले की, बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास मुलगी वडिलांसोबत गंगा घाटावर आली होती. तिच्या वडिलांनी तिला घरी पाठवले आणि स्वतः गंगेवर मासेमारी करायला गेले. बराच वेळ मुलगी घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला, मात्र मुलगी कुठेच सापडली नाही.
गुरुवारी सकाळी मुलीचा मृतदेह सापडला. घटनेनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी रक्ताचे डाग आढळले. पोलिसांनी मृतदेह वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मुंगेरचे एसपी म्हणाले की, एफआयआर नोंदवल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल.
डीएसपी सदर नंदजी प्रसाद म्हणाले की, मृतदेह पाहून असे दिसते की मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. पोलीस सर्व बाबतीत सखोल तपास करत आहेत आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होईल. यासोबतच मृतदेहाचा एक डोळा देखील बाहेर काढण्यात आला आहे. तसेच हाताची बोटेही काही जड वस्तूने चिरडली गेली आहेत. (हेही वाचा: Penetration In-between Thighs: पिडीतेच्या जांघांमध्ये केलेला लैंगिक अत्याचार सुद्धा 'बलात्कार'च; केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय)
दरम्यान, नुकतेच राजधानी दिल्लीमध्ये एका 9 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पीडितेच्या कुटुंबाला 10 लाखांची भरपाई जाहीर केली आहे. यासोबतच, ते म्हणाले की, मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वोत्तम वकील नियुक्त करेल.