Bigg Boss Marathi Season 5: 'जान्हवीसारख्या चिल्लर सदस्याच्या कलकलाटाकडे…'; अमेय खोपकर यांची पंढरीनाथ कांबळेसाठी खास पोस्ट

यावरून आता मनेसे नेते अमेय खोपकर यांनी पंढरीनाथ कांबळे यांची बाजू घेत जान्हवी किल्लेकरवर टीकास्र सोडलं आहे.

Photo Credit- X

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी सिझन 5 ची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नुकतच बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi Season 5 ) सिझन 5ने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. बिग बॉस मराठीमध्ये सिनेसृष्टीतील आणि रील इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध चेहरे या सिझनमध्ये दाखवले गेले आहेत. जसजसा शो पुढे जात आहे. तसतसे स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगल्याच दिसत आहे. प्रत्येक एपिसॉड हा वादग्रस्त होत आहे. त्यामुळे त्याची सोशल मीडियावरही तुफान चर्चा होत आहे. आता जान्हवी किल्लेकरने( Jahnavi Killekar ) पंढरीनाथ कांबळे ऊर्फ पॅडीचा त्याच्या अभिनयावरून त्यांचा अपमान केला. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकरांनी(Ameya Khopkar) पंढरीनाथ कांबळेची बाजू घेत जान्हवी किल्लेकरवर टीकास्र सोडलं आहे. (हेही वाचा: Bigg Boss Marathi Season 5: जान्हवी किल्लेदार च्या पंढरीनाथ कांबळींच्या 'अभिनय कारकीर्दी'वरील टीप्पणी नंतर विशाखा सुभेदार, अंकुर वाढवे, अभिजित केळकर सह अनेक कलाकारांनी व्यक्त केला संताप)

काय म्हणली जान्हवी किल्लेकर

‘बिग बॉस’च्या मंगळवारच्या भागामध्ये जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळेचा अभिनयावरून अपमान केला. जान्हवी म्हणाली की, “सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात दम नाहीये समोर येऊन बोलायला. पॅडी दादाच्या तर काहीतरी अंगातच घुसलंय. आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले. आता ती ओव्हर अ‍ॅक्टिंग घरात दाखवतायत.” असं जान्हवी म्हणला त्यावर आर्या तिला जाब विचारायला गेली. तेव्हा जान्हवीने तिचा देखील अपमान केला. ती आर्याला म्हणाली की,'मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही.' त्यानंतर जान्हवीच्या या वर्तुणकीचा निषेध आता मराठी कलाकार मंडळी करत आहेत. (Bigg Boss Marathi 5: अभिजीतला 'बांगड्या घाल' म्हणणं जान्हवीला पडणार भारी; रितेश देशमुखे दिली घरा बाहेर काढण्याची धमकी)

अमेय खोपकरांची पोस्ट काय?

“पॅडी, तुझा प्रवास आणि तुझा संघर्ष आम्ही सर्वांनी खूप जवळून पाहिलाय. नेहमीच खळखळून हसवलंस आम्हाला सगळ्यांना… आताही बिग बॉसमध्ये शांत डोकं ठेवून तू जी धमाल करतोयस ती आम्ही मस्त एंजॉय करतोय. जान्हवीसारख्या चिल्लर सदस्यांच्या कलकलाटाकडे लक्ष द्यायची गरजच नाही. तू बिनधास्त लढ, आम्ही आहोत तुला फायनलपर्यंत घेऊन जायला”, असं अमेय खोपकर म्हणाले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif