अभिनंदन! JEE Main मध्ये परीक्षेत मध्य प्रदेशाच्या ध्रुव अरोरा याची शंभर गुणांनी बाजी
मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) राहणारा ध्रुव अरोरा याने शंभर गुण मिळवत जेईई-मेन (JEE Main) या परीक्षेमध्ये बाजी मारली आहे.
मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) राहणारा ध्रुव अरोरा याने शंभर गुण मिळवत जेईई-मेन (JEE Main) या परीक्षेमध्ये बाजी मारली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ध्रुव अरोरा याचे अभिनंदन केले आहे.
ध्रुव अरोरा ह्याला जेईई-मेनच्या अभ्यासक्रमात मिळालेल्या यशामुळे तो अत्यंत खूश आहे. ध्रुवच्या अथांग परिश्रम आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे ध्रुवला हे यश प्राप्त करता आले आहे. तसेच नेटवर्क18 दिलेल्या मुलाखतीत ध्रुवने सांगितले की, खूप मेहनत केल्यास यश मिळतेच. परंतु मेहनत करण्यासोबत आपली आवड ही त्या अभ्यासासाठी असणे महत्वाचे आहे.
जेईई-मेनच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेला ध्रुव ह्याला आता रिसर्च क्षेत्रात अभ्यास करायचा आहे. तसेच ध्रुवचे आईवडिल फार्मास्यूटिकल कंपनीमध्ये कार्यरत आहेत. या परिक्षेत एकूण 15 जणांनी शंभर गुण मिळवले आहेत. नॅशनल टेस्टिंग ऐजसींने दिलेल्या माहितीनुसार ध्रुव याचे नाव प्रथम आहे. या परिक्षेसाठी यावेळी 9,29,198 विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी तयारी केली होती. त्यामधून 8,74,469 विद्यार्थी परिक्षेला बसले होते.