Bhima Koregaon Violence Case: फादर स्टेन स्वामी यांच्या संगणकामध्ये हॅकरने प्लांट केली 44 आक्षेपार्ह कागदपत्रे- रिपोर्ट

फादर स्टेन यांना सन 2020 मध्ये कथितरित्या दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पाठीमागील वर्षी त्यांचे निधन झाले.

Father Stan Swamy (Photo Credits: PTI)

भीमा कोरेगाव हिंसाचार (Bhima Koregaon Violence Case) प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते फादर स्टेन स्वमी (Father Stan Swamy) यांच्याशी संबंधीत एक नवा आणि धक्कादायक खुलासा आला आहे. अमेरिकी फॉरेन्सीक संस्थेने दिलेल्या एका अहवालात हा खुलासा पुढे आला आहे. फादर स्टेम स्वामी यांच्या कॉम्पूटरमध्ये आक्षेपार्ह असे जवळपास 44 कागदपत्रं ही हॅकरद्वारे प्लांट करण्यात आली होती, असा हा अवाहल सांगतो. फादर स्टेन यांना सन 2020 मध्ये कथितरित्या दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पाठीमागील वर्षी त्यांचे निधन झाले.

अमेरिकी फॉरेन्सीक फर्मचा हा अहवाल भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) च्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. एनआयएने आपल्या चौकशीत फआदर स्टेन स्वामी आणि कथीत माओवादी नेत्यांमध्ये कथितरित्या इलेक्ट्रॉनिक संवाद झाल्याचा गंभीर आरोप केला होता. (हेही वाचा, Stan Swamy Pases Away: कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी फादर स्टेन स्वामी यांचे निधन)

फादर स्टेन स्वामी यांच्या वकीलांद्वारे ठेवण्यात आलेल्या बोस्टन येथील एका फॉरेन्सीक संस्थेच्या आर्सेनल कन्सल्टिंगचे म्हणने आहे की, तथाकथीत माओवादी पत्रांसह सुमारे 44 कागदपत्रे एका अज्ञात साबर हॅकरने स्टेन स्वामी स्वामी यांच्या संगणकात घुसवण्यात आली. या हॅकरने प्रदीर्घ काळ स्टेन स्वामी यांच्या कॉम्पूटरचा अॅक्सेस मिळवला होता.

सुरुवातीच्या काही काळात स्टेन स्वामी यांनी पादरी म्हणून काम केले. मात्र, नंतर पुढे त्यांनी आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी लढा सुरु केला. एक मानव अधिकार कार्यकर्ता म्हणून त्यांनी झारखडमध्ये विस्थापन विरोधी जनविकास आंदोलनाची स्थापना केली. ही सघटना आदिवासिंच्या आणि दलितांच्या अधिकारांसाठी लढाई लढते. फादर स्टेन स्वामी झारखंड ऑर्गनायजेशन अगेन्स्ट यूरेनियम रेडियेशनशीसुद्धा संबंधी होती. जीने 1996 मध्ये यूरेनियम कॉर्पोरेशनविरुद्ध आंदोलन सुरु केले होते. ज्यानंतरत चाईबासामध्ये धरण बांधण्याचे काम थांबविण्यात आले होते.

सन 2010 मध्ये फाद स्टॅन स्वामी यांना 2010 मध्ये यांना तुरुंगवास झाला होता. या वेळी त्यांनी 'जेलमध्ये बंद कैदियों का सच' नावाचे एक पुस्तकही प्रकाशित केले. ज्यात त्यांनी उल्लेख केला आहे की, आदिवासीं तरुणांना नक्षलवादी असल्याच्या खोट्या आरोपांमध्ये कसे तुरुंगात टाकले जात आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सिस्टर अनु यांनी सांगितले की, स्वामी गरीब अआदिवासिंनाही जेलमध्ये भेटायलाही जात असत. त्यांचा नक्षलवाद्यांशी कोणताही संबंध नाही.