Bharat Jodo Yatra: 'देशात दोन भारत', कर्नाटकातील शेतकरी आत्महत्येवरुन राहुल गांधी आक्रमक, केंद्र सरकारवर टीकास्त्र

राहुल गांधी यांच्या बोलण्यात प्रामुख्याने कर्नाटक राज्यातील शेतकरी आत्महत्येचा (Farmer Suicide) मुद्दा केंद्रस्थानी होता. राहुल गांधी यांनी म्हटले की, केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशात सध्या दोन भारत निर्माण झाले आहेत. यात पहिला भारत श्रीमंताचा आहे. दुसरा भारत गोरगरीबांचा आहे.

Rahul Gandhi | (Photo Credit - Twitter)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) हळूहळू पुढे सरकत आहे. जनमानसाचा पाठिंबाही त्याला मोठ्या प्रमाणावर मिळू लागला आहे. भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटक (Karnataka) राज्यात आहे. कर्नाटकमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. राहुल गांधी यांच्या बोलण्यात प्रामुख्याने कर्नाटक राज्यातील शेतकरी आत्महत्येचा (Farmer Suicide) मुद्दा केंद्रस्थानी होता. राहुल गांधी यांनी म्हटले की, केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशात सध्या दोन भारत निर्माण झाले आहेत. यात पहिला भारत श्रीमंताचा आहे. दुसरा भारत गोरगरीबांचा आहे. ही दरी आज आपल्याला कमी करायची आहे, असेही राहुल गांधी या वेळी म्हणाले.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गुरुवारी ते एका महिलेला भेटले जिने आपला शेतकरी पती गमावला होता. 50,000 रुपयांचे कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या केल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटना घडतात याचे कारण देशात दोन भारत निर्माण झाले आहे. हे सर्व विषमतेमुळे निर्माण झाले आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. (हेही वाचा, Sonia Gandhi Joins Bharat Jodo Yatra: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी 'भारत जोडो यात्रे'त सहभागी, राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा)

ट्विट

राहुल गांधी यांनी पुढे म्हटले आहे की, एक भारत आहे जेथे व्यापारी मित्रांना 6 टक्के व्याजाने कर्ज दिले जाते आणि त्यांची कर्जे माफ केली जातात. आणखी एक भारत आहे जिथे अन्न उत्पादकांना 24 टक्के व्याजाने कर्ज दिले जाते. आणि ते अडचणींनी भरलेले जीवन जगतात.

एका राष्ट्रात दोन भारत - आम्ही सहन करणार नाही, असे ट्विटही राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी भूतकाळात, आणि भारत जोडो यात्रेदरम्यानही केंद्र सरकारवर अनेकदा टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकार सर्वोच्च उद्योगपतींना समर्थन देत आहे. या उद्योगपतींची संपत्ती, सरकारी समर्थनामुळेच वाढत आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.