भारत बायोटेक च्या COVID-19 Vaccine 'COVAXIN' ला DCGI ची परवानगी; जुलै मध्ये सुरु होणार मानवी चाचण्या

ही लस भारत बायोटेकने (Bharat Biotech) विकसित केली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतात COVAXIN या पहिल्या कोविड 19  लसीला  (COVID 19 Vaccine) औषध नियामक डीसीजीआय (DCGI) तर्फे I आणि II Phase मध्ये मानवी क्लिनिकल चाचणी (Human Trials) साठी मान्यता मिळाली आहे. ही लस भारत बायोटेकने (Bharat Biotech) विकसित केली आहे. जुलै 2020 मध्ये भारतभर मानवी क्लिनिकल चाचण्या सुरू होणार आहेत. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) यांच्या सहकार्याने COVAXIN ही लस विकसित करण्यात आली आहे. SARS-CoV-2 लसीचे पुण्यातील (Pune) NIV येथे संशोधन करून पुढे भारत बायोटेकमध्ये हस्तांतरण करण्यात आले होते. Arogya Sandesh: रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार बाजारात आणणार ‘आरोग्य संदेश’ मिठाई; जाणून घ्या खासियत

भारत बायोटेक हे आघाडीची औषध निर्मिती संस्था आहे. आजवर पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी एन्सेफलायटीस, चिक या अनेक लसींमध्ये व्हर्ओ सेल कल्चर प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी भारत बायोटेकचा ट्रॅक रेकॉर्ड सिद्ध झाला आहे. येत्या काळात H1N1 चा संभाव्य प्रसार लक्षात घेता त्यासाठी सुद्धा अगोदरच बायोटेक मध्ये संशोधन सुरु करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. Global Pandemic निर्माण करण्याची क्षमता असलेला Swine Flu चा नवा प्रकार चीन मध्ये संशोधनात आला समोर, वाचा सविस्तर

दरम्यान, जगभरातील अनेक औषधी उत्पादक कोरोनाव्हायरसवर उपचार शोधण्यासाठी कार्यरत आहेत, परंतु अद्याप कोणत्याही औषधी कंपनीला निश्चित यश आलेले नाही. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनच्या लष्कराला त्याच्या संशोधन युनिट आणि कॅनसिनो बायोलॉजिक्सने विकसित केलेल्या कोरोना लसीचा वापर करण्यास अनुमती मिळाली होती. क्लिनिकल चाचणीनंतर ते सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आणि त्याने काही प्रमाणात कार्यक्षमता सुद्धा दर्शविली होती.

भारतात सद्य घडीला देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 66 हजार 840 इतकी आहे. गेल्या 24 तासांत 418 नवे रुग्ण दगावले असून देशात मृतांचा एकूण आकडा 16,893 वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 3,34,822 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जगभरातही कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटीच्या पार गेला आहे.