COVID-19 Vaccine Update: भारताच्या कोविड 19 वरील संभाव्य लस Covaxin चे Animal Trials अहवाल सकारात्मक; Bharat Biotech ची माहिती

दिलादायक बाब म्हणजे ते सकारात्मक आले आहेत.

Vaccine | Image used for representational purpose (Photo Credits: Oxford Twitter)

कोरोना व्हायरसचं (Coronavirus) थैमान रोखण्यासाठी आता जगभरात कोविड 19 (COVID 19) विरूद्ध ची लस शोधण्याचे प्रयत्न वाढले आहेत. भारतामध्ये देखील विविध टप्प्यांत 3 लसींच्या मानवी चाचणींचं काम सुरू आहे. यामध्ये Bharat Biotech च्या Covaxin या लसीचे नुकतेच Animal Trials अहवाल प्रसिद्ध झाले आहे. दिलादायक बाब म्हणजे ते सकारात्मक आले आहेत. लाइव वायरल चॅलेंज मॉडलमध्ये वॅक्सीनने सुरक्षित परिणाम दाखवले आहेत. त्यामुळे आता या लसीबद्दल संशोधकांसोबतच भारतीय नागरिकांच्यादेखील आशा पल्लवित झाल्या आहेत. Rhesus Macaques या विशिष्ट जातीच्या माकड्यांवर लसीची चाचणी झाली असून 20 माकडांना 4 ग्रुप मध्ये विभागले होते. त्यानंतर त्यांना लस देण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे त्यांच्या शरीरात कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आवश्यक अ‍ॅन्टिबॉडीज तयार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

भारतभर सध्या Covaxin ही कोविड 19 वरील संभाव्य लस मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीच्या आठवड्यामध्येच Central Drugs Standard Control Organisation कडून मानवी चाचणीच्या दुसर्‍या टप्प्याला परवानगी देण्यात आली आहे. COVAXIN Clinical Test: कोरोनावरील भारतीय लस कोव्हॅक्सिन ची दुसरी क्लिनिकल चाचणी नागपुर मध्ये सुरु

Bharat Biotech ट्वीट

भारतामध्ये ICMR सोबत Bharat Biotech आणि NIV यांच्या संयुक्त प्रयत्नाने बनवण्यासाठी काम सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये नागपूर मध्ये त्याचे काही डोस देण्यात आले आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान दिल्ली आणि पटना (AIIMS), विशाखापट्टनम मध्ये किंग जॉर्ज अस्पताल, हैदराबाद मध्ये निज़ाम च्या आयुर्विज्ञान संस्थानमध्ये लसीची मानवी चाचणी होत आहे. तर यासोबत रोहतक मध्ये पीजीआई मध्येदेखील ट्रायल्स सुरू आहेत.

भारतामध्ये कोवॅक्सिन सोबतच ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेका च्या लसीचं सीरम इंस्टिट्युट कडून कोविशिल्ड या लसीच्या नावाखाली चाचणी सुरू आहे. तर झायडस कॅडिला देखील मानवी चाचण्या घेत आहे. दरम्यान सध्या सीरम इंस्टिट्युटला कोविशिल्डच्या चाचण्या थांबवण्याचे आदेश आहेत. कारण काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये एका व्यक्तीवर या लसीनंतर काही प्रतिकूल परिणाम झाल्याचं आढळलं आहे. मात्र कंपनीला अजूनही लवकरच हाअडथळा दूर करून पुन्हा मानवी चाचणी करण्यास सरकार परवानगी देईल आणि लवकरात लस बाजारात उपलब्ध होऊ शकेल अशी आशा आहे.