Bharat Bandh 2022: भारत बंद, दोन दिवस बँक, वीज सेवांवर परिणाम, नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता

त्यामुळे या परिणामांची दखल घेत बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला अखिल भारतीय बँक कर्मचारी संघानेही आपला पाठींबा दिला आहे.

Bharat Bandh (Photo Credits: ANI/Twitter)

केंद्रीय ट्रेड युनियन्सनी (Central Trade Unions) ने आज (सोमवार, 28 मार्च) आणि उद्या (मंगळवार, 29 मार्च) भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. केंद्र सरकारचे विविध निर्णय आणि भूमिका यांविरोधात या युनियन्सनी बंदचे हत्यार उपसले आहे. केंद्र सरकारने घेतलेले अनेक निर्णय आणि भूमिका यांचा थेट परिणाम शेतकरी, सरकारी कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांवर पडतो आहे. त्यामुळे या परिणामांची दखल घेत बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला अखिल भारतीय बँक कर्मचारी संघानेही आपला पाठींबा दिला आहे.

बंद पुकारलेल्या संघटनांनी म्हटले आहे की, रस्ते आणि वीज कर्मचारीसुद्धा या बंदमध्ये सहभागी असतील. बँक कर्मचाऱ्यांनीही या संपाचे समर्थन केले आहे. त्यामुळे देशातील विविध सेवा आज ठप्प किंवा धिम्या गतीने सुरु राहू शकतात. संभाव्य बंद विचारात घेऊन वीज मंत्रालयानेही राज्य सरकारला पत्र लिहून विद्युत पुरवठा कायमर राहील याची दक्षता घेण्यास सांगितली आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात केंद्रीय ट्रेड यूनियन्सनी संयुक्त व्यासपीठावर आणि विविध क्षेत्रांतील स्वतंत्र कामगार संघटनांनाही बंदला पाठींबा देण्याचे अवाहन केले आहे.

केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारे खासगीकरण करु नये. सरकारी उद्योगांच्या खासगीकरणास विरोध, ऑल इंडिया बँक कर्मचारी असोशीएशनने म्हटले आहे की, आम्ही बँकींग क्षेत्राच्या मागण्यांसाठी बंदमध्ये सहभागी आहोत. ट्रेड युनियन्सनी दोन दिवसांच्या पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर उर्जा मंत्रालयाने राज्य सरकारांना पत्र लिहून विद्युत पुरवठा कायम राहील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

एसबीआय आणि इतर काही बँकांनी म्हटले आहे की, बंदमुळे त्यांच्या सेवा काही काळापर्यंत बंद राहू शकतात तसेच काही ठिकाणी अधिक काळासाठी सेवांची गती मंदावू शकते.दरम्यान, लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी बँकांनी आपापल्या शाखांमध्ये आवश्यक व्यवस्था केली आहे.दरम्यान, या काळात ऑनलाईन सेवा मात्र सुरु राहील.