Bhandara Accident: रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या जोडप्याला ट्रकने उडविले, पती-पत्नीचा जागीच मृत्यू
या अपघाताचे थरारक दृश्य सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
भंडाऱ्यात (Bhandara) तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी येथे एक भीषण अपघात घडला आहे. दुचाकीसह रस्त्याच्या उभे असलेल्या रस्त्याने विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघाताचे थरारक दृश्य सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात आणखी एक महिला देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. तुमसर-मोहाडी राज्यमार्गवरील खरबी येथे जि प शाळेसमोर ही घटना घडली आहे. (हेही वाचा - Eastern Express Highway Traffic: वाहतूक कोंडीने गुदमरला पूर्व द्रुतगती मार्गाचा श्वास, ठाणेकरांचे हाल)
भंडाऱ्यात तुमसर- मोहाडी राज्य मार्गावर खरबी येथे दुचाकीस्वार पती -पत्नी रस्त्याच्या बाजुला नातेवाईकांसोबत बोलत उभे होते. यावेळी विरुध्द दिशेने येणाऱ्या डब्लुसीएल कंपनीचा कोळसा भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार पती -पत्नीचा जागीच मृत्यू झाला. बालचंद ठोंबरे (वय 55) व वनिता ठोंबरे (वय 50) असे ट्रकच्या धडकेत ठार झालेल्या पती पत्नीचे नाव आहे. या अपघातात अन्य एक महीला गंभीर झाल्याची थरारक घटना घडली. नलु दामोधर बडवाईक (वय 40) असे जखमी असलेल्या महीलेचे नाव आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2023 01:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

