Bengaluru: गुलाबजामूनच्या बाऊलमध्ये आढळले मृत झुरळ; ग्राहकाला 55 हजार रुपये देण्याचे Kamath Hotel ला आदेश

बेंगळुरूच्या गांधीनगर भागातील कामथ हॉटेलमध्ये (Kamath Hotel) जामूनच्या बाऊलमध्ये एका ग्राहकाला मृत झुरळ आढळला होता

Cockroach (Photo Credits: Pixabay)

बेंगळुरूमधील (Bengaluru) एका प्रसिद्ध रेस्टॉरंटला एका चुकीमुळे मोठा भुर्दंड पडला आहे. बेंगळुरूच्या गांधीनगर भागातील कामथ हॉटेलमध्ये (Kamath Hotel) जामूनच्या बाऊलमध्ये एका ग्राहकाला मृत झुरळ आढळला होता. या ग्राहकाला 55,000 रुपये देण्याचे आदेश रेस्टॉरंटलाला देण्यात आले आहेत. ही घटना सप्टेंबर 2016 मध्ये घडली होती. 2018 मध्ये, जिल्हा ग्राहक मंचाने (District Consumer Forum) हॉटेल मालकाला तक्रारदार केएम राजन्ना यांना 55,000 रुपये देण्याचे आदेश दिले.

मात्र त्यानंतर रेस्टॉरंटने या आदेशाविरोधात अपील केले, परंतु कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाने (Karnataka State Consumer Disputes Redressal Commission) या वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्वीचा आदेश कायम ठेवला. मिळालेल्या माहितीनुसार, व्यवसायाने वकील असलेले राजन्ना आणि त्यांचे मित्र 15 सप्टेंबर 2016 रोजी कामथ हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी डोसा आणि जामुन मागवले. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, राजन्नाला जमुनाच्या वाडग्यात एक मृत झुरळ तरंगताना आढळले होते.

जेव्हा त्यांनी डिशचे फोटो घेण्यास सुरुवात केली, तेव्हा सेवा देणाऱ्या वेटरने त्यांचामोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे रेस्टॉरंटमध्ये गोंधळ उडाला. या घटनेनंतर राजन्ना यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि कामथ हॉटेलवर कारवाई करण्यासाठी जिल्हा ग्राहक मंचाशी संपर्क साधला. मालकाने 2018 मध्ये दिलेल्या कायदेशीर नोटीसला प्रतिसाद दिला नाही. परिणामी, ग्राहक मंचाच्या न्यायाधीशांनी हॉटेलला 50,000 रुपये भरपाई देण्यास सांगितले, सोबतच खटल्याच्या संबंधित खर्चासाठी 5,000 रुपये अतिरिक्त देण्यास सांगितले.

कामथ हॉटेलच्या प्रतिनिधींनी या आदेशाविरोधात कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगात अपील केले. तिथे त्यांनी दावा केला की त्यांना जिल्हा उपभोक्ता मंचामध्ये त्यांच्याविरोधातील खटल्याची माहितीच नव्हती. याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची नोटीस आल्यानंतर त्यांना हे प्रकरण समजले. त्यावेळी त्यांच्या वेटरने राजन्नावर हल्ला केल्याचा आरोप नाकारला. (हेही वाचा: Viral Snake Video: तरुणाचा सापासोबतचा थरारक व्हिडिओ पहा)

न्यायाधीशांनी कोणतीही गोष्ट मान्य केली नाही, उलट यासंदर्भात पोलीस केस नोंदवण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. अशा प्रकारे त्यांनी जिल्हा ग्राहक मंचाचा 24 सप्टेंबर रोजीचा आदेश कायम ठेवला.