Bengaluru Crime: Aeronics Internet कंपनीचे CEO वेणू कुमार आणि MD फणींद्र सुब्रमण्य यांची बेंगळुरूमध्ये हत्या, आरोपींना अटक

या तिघांनाही आज अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Aeronics Internet कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वेणू कुमार आणि एमडी फणींद्र सुब्रमण्य यांची एका माजी कर्मचाऱ्याने हत्या केली होती. आरोपीने त्यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. डीसीपी ईशान्य बेंगळुरू, लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले की, दोघांचाही रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. यांच्या हत्येप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. शबरिश, विनय रेड्डी आणि संतोष अशी आरोपींची नावे आहेत. सध्या या घटनेचा पुढील तपास हा पोलीस करत असून आरोपींना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

(हेही वाचा - Delhi Crime: दिल्ली पुन्हा हादरली; गीता कॉलनी जवळ महिलेच्या शरीराचे तुकडे सापडल्याने खळबळ)

पाहा व्हिडिओ -

खुनाच्या वृत्ताने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, आरोपी आधी एरोनिक्स इंटरनेटमध्ये काम करायचा. ती नोकरी सोडून त्याने स्वतःची टेक कंपनी सुरू केली. मात्र, जुन्या कंपनीमधील वरिष्ठ लोक त्याच्या व्यवसायात अडथळा आणत होते. या कारणामुळे  त्यांच्यावर खूप राग होता.

डीसीपी ईशान्य बेंगळुरू लक्ष्मी प्रसाद यांनी यापूर्वी सांगितले होते की आरोपीसोबत आणखी दोन लोक होते. या तिघांनाही आज अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.