Beed Crime: बीडमध्ये तरुणाची दगडाने ठेचून हत्या, शहरात खळबळ

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून याचा तपास हा करत आहे.

Crime Image File

बीड (Beed Crime) जिल्ह्यात वारंवार गंभीर गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत.  बीड शहरात (Beed City) एका तरुणाच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या चऱ्हाटा रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या (Railway Flyover) बाजूला एका 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून याचा तपास हा करत आहे.  (हेही वाचा - Ratnagiri Sex Racket: कोकणात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफास, पोलीसांकडून फार्म हाऊसवर छापा)

बीड शहरात 30 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. प्राथमिक माहितीवरून पांडुरंग नारायण माने असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळावर मृतदेहाच्या बाजूलाच (MH-23 AM - 7094) या क्रमांकाची दुचाकीही सापडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. नेमकी तरुणाची हत्या कोणी केली ? हत्येचे कारण काय ? याचा तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.

बीड शहरात या घटनेने दहशतीचे वातावरण पसरले आहे. शहरापासून काही अंतरावर ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत असून अद्याप हत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.