Coronavirus: लॉक डाऊनमुळे लहान मुलांवरील अत्याचार वाढले; सरकारी हेल्पलाईनवर Child Abuse बाबत 92 हजारपेक्षा जास्त कॉल्स

सध्याची परिस्थिती पाहता हे लॉकडाऊन अजून वाढण्याची शक्यात आहे

Child Abuse (Representational Image-File Image)

कोरोना विषाणू (Coronoavirus) चा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचे लॉक डाऊन (Lockdown) जाहीर केले आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे लॉकडाऊन अजून वाढण्याची शक्यात आहे. मात्र याची दुसरी बाजू म्हणजे यामुळे स्त्रिया व लहान मुलांवरील अत्याचाराच्या (Violence) घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महिलांवरील वाढत्या घरगुती हिंसाचाराच्या वृत्तानंतर, आता मुलांवर होणाऱ्या अत्याचाराची धक्कादायक बाब समोर येत आहे. चाइल्डलाइन इंडिया हेल्पलाईन क्रमांकावर गेल्या 11 दिवसांत लहान मुलांवरील अत्याचाराबाबत तब्बल 92,000 कॉल आले आहेत.

याबाबत चाइल्डलाइन इंडियाचे उपसंचालक हरलीन वालिया यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, 20 मार्च ते 31 मार्च या कालावधीत 'चाइल्डलाइन 1098' वर संकटात सापडलेल्या एकूण 3.07 लाख कॉलपैकी, 30 टक्के कॉल हे लहान मुलांवरील अत्याचाराबाबत होते. म्हणजेच या काळात तब्बल 92,105 मुलांवर अत्याचार झाले आहेत. जिल्ह्यातील बाल संरक्षण घटकांसाठी आयोजित केलेल्या अ‍ॅडॉप्टेशन कार्यशाळेत ही आकडेवारी समोर आली. यावेळी महिला व बालविकास मंत्रालयाचे उच्च अधिकारीही उपस्थित होते.

कोरोना विषाणूशी संबंधित मुद्द्यांविषयी आणि लॉकडाऊन दरम्यान मुलांवरील अत्याचार कमी करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. आकडेवारीनुसार, एकूण फोन कॉलपैकी 11 टक्के शारीरिक आरोग्याविषयी, आठ टक्के हे बाल कामगारांच्या तक्रारींबाबत, पळून जाणाऱ्या मुलांविषयी आठ टक्के आणि बेघर लोकांबद्दल पाच टक्के फोन आले आहेत. (हेही वाचा: कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ; उत्तरप्रदेश, दिल्ली आणि पंजाबमध्ये सर्वाधिक तक्रारी)

याव्यतिरिक्त, हेल्पलाइनला कोरोना विषाणूबद्दल प्रश्न विचारण्यासाठी 1,677 कॉल प्राप्त झाले आणि आजारी लोकांच्या मदतीबद्दल 237 लोकांनी कॉल केले. लॉकडाऊन दरम्यान हेल्पलाइनला आवश्यक सेवा घोषित करावी अशी सूचना वालियाने यांनी केली आहे. त्याचबरोबर आयोगाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 24 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत महिलांवरील विविध अत्याचारांशी संबंधित 257 तक्रारी आल्या आहेत. यापैकी 69 तक्रारी घरगुती हिंसाचाराशी संबंधित आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif