Bar Code On Medicine: आता देशात 300 औषधांवर बार कोड अनिवार्य

Unique Product Identification Code मध्ये औषधाचे योग्य आणि जेनेरिक नाव, ब्रँड नाव,निर्मात्याचे नाव आणि पत्ता, बॅच क्रमांक; उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट आणि उत्पादन परवाना क्रमांक यांचा समावेश असणार आहे.

Medicines प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credits-File Image)

नागरिकांची औषधांमध्ये फसवणूक टाळण्यासाठी आता महत्त्वाच्या 300 औषधांवर बार कोड (Bar Code)  किंवा क्यू आर कोड (QR Code) लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये Allegra, Shelcal, Calpol, Dolo, आणि Meftal Spas या औषधांचा समावेश असणार आहे.

ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने फार्मा कंपन्यांना नवीन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसे न केल्यास त्यांना कठोर दंड आकारला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारताच्या सर्वोच्च औषध नियामकाने फार्मा बॉडी असोसिएशनना त्यांच्या सदस्य कंपन्यांना नवीन नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

unique product identification code मध्ये औषधाचे योग्य आणि जेनेरिक नाव, ब्रँड नाव,निर्मात्याचे नाव आणि पत्ता, बॅच क्रमांक; उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट आणि उत्पादन परवाना क्रमांक यांचा समावेश असणार आहे.

1 ऑगस्ट 2023 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित केलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार औषधांच्या फॉर्म्युलेशनच्या कोणत्याही ब्रँडच्या बॅचच्या उत्पादनाच्या साइटचे स्थान विचारात न घेता, या सरकारी अधिसूचनेनुसार त्याच्या लेबलवर बारकोड किंवा QR कोड असेल. औषधांच्या फॉर्म्युलेशनच्या 300 ब्रँडवर QR कोड प्रिंट करणे / जोडणे अनिवार्य केले आहे. जर कोणताही उत्पादक स्वेच्छेने इतर कोणत्याही ब्रँडसाठी बार कोड किंवा QR कोड जोडू/प्रिंट करू इच्छित असेल, तर तो तसे करण्यास मोकळा आहे असे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) कडून सांगण्यात आले आहे.

हा बार कोडचा निर्णय सर्व देशी तसेच परदेशी उत्पादकांसाठी लागू असणार आहे.