ऑगस्ट महिन्यात 'या' दिवशी बँक बंद राहणार, येथे पाहा संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली असून उद्योगधंद्याच्या विविध क्षेत्रात काही नियमांत बदल करण्यात आले आहेत.

बँक (Photo Credits: Twitter)

ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली असून उद्योगधंद्याच्या विविध क्षेत्रात काही नियमांत बदल करण्यात आले आहेत. त्याचसोबत या महिन्यात रक्षाबंधन आणि कृष्णजन्माष्टमीसह अन्य उत्सव आल्याने बँक बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेची काही महत्वाची कामे पूर्ण करण्यापूर्वी एकदा बँक ऑफ इंडियाची हॉलिडे यादी पहावी लागेल.

ऑगस्ट महिन्यातील विविध उत्सावांमुळे कुठे आणि किती दिवस बँक बंद राहणार आहे याची यादी तुम्हाला येथे मिळू शकते.खरतर प्रत्येक राज्यात बँक हॉलिडे असतोच. परंतु या महिन्यातील 8 दिवस असे आहेत की त्यामुळे देशातील बहुतांश बँक बंद राहणार आहेत.येत्या 15 ऑगस्ट रोजी येणाऱ्या स्वातंत्र्यादिनानिमित्त बँका बंद राहणार आहेत. तसेच 12 तारखेला ईद-उल-जुहा (बकरी ईद) ची सुट्टी असणार आहे.

4,11,18 आणि 25 ऑगस्टला रविवार असल्याने बँक बंदच असतात. तर 10 आणि 24 ऑगस्ट रोजी दुसरा आणि चौथा शनिवार आल्याने बँक बंद राहणार आहे. राज्यातील या 8 सुट्टीच्या दिवसांव्यतिरिक्त मुंबईत 17 ऑगस्टला बँक बंद राहणार आहे. या दिवशी पारसी नवं वर्ष सुरु होणार असल्याने बँकसंबंधित कोणतेही काम तुम्हाला करता येणार नाही.(1 ऑगस्टपासून तुमच्या दैनंदिन व्यवहारात झाले आहेत हे महत्वपुर्ण बदल, जाणून घ्या सविस्तर)

तसेच 20 तारखेला श्री श्री माधव देव तिथी असल्याने आसाम मध्ये बँक बंद राहणार. हरियाली तीज 3 ऑगस्टला असल्याने पंजाब, हरियाणा, चंदीगढ़ येथील बँका बंद राहणार आहेत. मुख्यत्वे 23 ऑगस्टला आलेल्या कृष्णजन्माष्टमीमुळे राज्यातील विवध ठिकाणच्या बँका बंद असणार आहेत. देशातील मुख्य शहरांमधील ऑगस्ट महिन्यातील बँक हॉलिडेची यादी पाहण्यासाठी https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.