Banglore: ब्रेकअप झाल्याच्या रागात प्रियकारकडून काही गाड्यांची तोडफोड
शहरातील डीसीपी वेस्ट झोनमध्ये 27 वर्षीय एका व्यक्तीने गुरुवारी उशिरा रात्री काही गाड्यांची तोडफोड केली. पोलिसांनी सकाळी आरोपीला अटक केली आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे एका प्रियकराचे ब्रेकअप झाल्याने त्याने संताप व्यक्त करत काही गाड्यांची तोडफोड केली आहे. शहरातील डीसीपी वेस्ट झोनमध्ये 27 वर्षीय एका व्यक्तीने गुरुवारी उशिरा रात्री काही गाड्यांची तोडफोड केली. पोलिसांनी सकाळी आरोपीला अटक केली आहे.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे ब्रेकअप झाले होते. त्यामुळे त्याला दु:ख आवरले नाही आणि त्याचाच राग व्यक्त करण्यासाठी त्याने गाड्या फोडल्या. आरोपीने आपला गुन्हा सुद्धा कबुल केला आहे. सध्या बंगळुरु पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.
तर काही दिवसांपूर्वीच दक्षिण बंगळुरुतील चेन्नमनाकेरे अचुकट्टू येथे नशेत असलेल्या दोन अल्पवयीन आणि एका 20 वर्षीय मुलामध्ये जोरदार राडा झाला होता. यानंतर आरोपींनी घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्या आणि कारसह 15 वाहनांची तोडफोड केली होती. तोडफोड करण्याचा आवाज ऐकूण लोक घराबाहेर आले होते.(Delhi Murder: मैत्रीला विरोध केला म्हणून 16 वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या, एकास अटक)
दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून सर्व आरोपींची ओळख पटवून अटक केली होती. अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते. तर एका आरोपीला ताब्यात घेत त्याची खुप चौकशी केली गेली. हे सर्वजण मजूर असून नापास झालेले आहेत. ज्यावेळी तिघांना ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी आमची चुकी नसल्याचे म्हटले. पण तिघांनी दारु घेतल्याचे मान्य केले. पण आम्हाला गाड्या फोडल्याचे आठवत नसल्याचे त्यांनी म्हटले. जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता त्यांच्याकडे कोणतेच उत्तर नव्हते.