IPL Auction 2025 Live

Balrampur Gangrape: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार; आरोपींनी कंबर, पाय तोडलेल्या पीडितेचा मृत्यू, बलरामपूर येथील घटना

दुसऱ्या बाजूला पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, पीडितेवर गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.

Gangrape | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

उत्तर प्रदेश (UP) राज्यात हाथरस (Hathras) येथील सामूहिक बलात्कार (Gang Rape) प्रकरण ताजे असताना अशाच पद्धतीची घटना पुन्हा एकदा घडली आहे. उत्तर प्रदेशमधील बलरामपुर (Balrampur) जिल्ह्यातील गैसडी येथील एका गावात एका मुलीवर सामूहिक बलात्कार (Gangrape ) करण्यात आला आहे. आरोपींनी पीडितेवर बलात्कार केल्यानंतर तिची कंबर आणि पाय तोडले. उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना पीडितेचा मृत्यू रस्त्यातच झाला.प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी 29 सप्टेंबरच्या सकाळी आठ वाजता आपल्या घरुन कॉलेजला अॅडमिशन घेण्यासाठी गेली. या वेळी तिचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी पीडिता बेशुद्ध (स्वनियंत्रण गमावलेल्या) अवस्थेत घरी पोहोचली. कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला दुसऱ्या दवाखण्या घेऊन जाण्यास सांगितले. दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात असताना पीडितेचा रस्त्यातच मृत्यू झाला.

दरम्यान, बलरामपूरचे जिल्हाधिकारी हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप होत आहे. दुसऱ्या बाजूला पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, पीडितेवर गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. ( हे देखील वाचा- Hathras Gangrape Case: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून अंत्यसंस्कार; कुटुंबीयांना घरात कोंडून ठेवल्याचा आरोप)

पीडितेच्या आईने आरोप केलाआहे की, पीडिता जेव्हा डिग्री कॉलेजमध्ये गेली तेव्हा तिचे काही मित्र तिला घेऊन आपल्या ई रिक्षातून मार्केटमधील एका खोलीत घेऊन गेले. तिथे त्यांनी तिला एक इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी पीडितेची कंबर आणि दोन्ही पाय तोडले. त्यानंतर त्यांनी मुलीला बेशुद्धावस्थेतच रिक्षात बसवून घरी पाठवून दिले. ती जेव्हा घरी पोहोचली तेव्हा ती बोलू शकली नाही. ती रडत कसेतरी इतकेच म्हणाली की, ' मम्मी मुझे बचा लीजिए, मैं मरना नहीं चाहती हूं' (हेही वाचा, Hathras Gangrape प्रकरणी चौकशीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नेमली 3 सदस्यीय SIT समिती; खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार)

दरम्यान, पीडितेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले आहे. मृतदेह पीडितेच्या नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात आला आहे. सूत्रांचया हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात पीडितेवर बलात्कार झाल्याचे म्हटले आहे. पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक होती. पीडितेच्या शरीराच्या अंतर्गत आणि बहिर्गत भागावार जखमा झाल्या होत्या. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.