Bags On Wheel: आता रेल्वे प्रवासावेळी सामानाची ने-आण करण्याची चिंता मिटली; Railway ने सुरु केली पिक अँड ड्रॉप सेवा, App द्वारे करू शकाल बुकिंग

झालेले नुकसान भरून काढण्यासाठी भारतीय रेल्वे (Indian Railways) अनेक प्रयत्न करीत आहे. यासाठी अनेक उपक्रमही राबवले जात आहेत. आताही महसूल वाढवण्याच्या उदेशाने रेल्वेने एक नवी योजना सादर केली आहे.

Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

झालेले नुकसान भरून काढण्यासाठी भारतीय रेल्वे (Indian Railways) अनेक प्रयत्न करीत आहे. यासाठी अनेक उपक्रमही राबवले जात आहेत. आताही महसूल वाढवण्याच्या उदेशाने रेल्वेने एक नवी योजना सादर केली आहे. गेले अनेक दिवस मागणी होत असल्याने आता उत्तर रेल्वे विभागाने सामानाची (Luggage) पिक अँड ड्रॉप सेवा सुरू केली आहे. ही सेवा अॅपवर आधारित असून, च्याच उपयोगाने वापरकर्ते आपले घर, हॉटेल किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून सामानाच्या वाहतुकीसाठी बुकिंग करू शकतात. हे समान प्रवाशाच्या कन्फर्म असलेल्या बर्थपर्यंत पोहोचवले जाईल.

याशिवाय रेलव स्टेशनवरून जर तुम्हाला कुठे सामान घेऊन जायचे असल्यास त्याचेही बुकिंग या अॅपवर करता येणार आहे. कोरोना साथीच्या काळात आता रेल्वे, प्रवाशांना आधी दिल्या जाणाऱ्या सुविधा पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेने अनेक गाड्या नियमितपणे चालवल्या आहेत. याच्या एक पाऊल पुढे जाऊन, रेल्वेच्या दिल्ली विभागाने 'बॅग्स ऑन व्हील्स सर्व्हिस' सुरू केली आहे. भारतीय रेल्वे प्रवाश्यांसाठी पहिल्यांदाच अशी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. (हेही वाचा: Mumbai local: मुंबई लोकलमधून प्रवासाठी सर्वांनाच मिळणार परवाणगी! रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात आज पार पडणार बैठक)

सीपीआरओ दीपक कुमार म्हणाले, 'BOW (Baggage On The Wheel) असे या अॅपचे नाव असून, ते अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. प्रवासी आपले सामान रेल्वे स्टेशनवर किंवा त्यांच्या घरी नेण्यासाठी या अॅपवर बुकिंग करू शकतात. हे सामान कंत्राटदाराकडून सुरक्षित पद्धतीने उचलले जाईल आणि प्रवाश्याच्या बुकिंगच्या पसंतीनुसार ते बर्थ अथवा त्याच्या घरी पोहोचवले जाईल. ही सेवा ज्येष्ठ नागरिक, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या यांच्यासाठी उपयुक्त ठरेल, असा दावा रेल्वेने केला आहे.

सर्वप्रथम ही सेवा नवी दिल्ली, दिल्ली जंक्शन, हजरत निजामुद्दीन, दिल्ली कॅन्ट, दिल्ली सराय रोहिल्ला, गाझियाबाद आणि गुडगाव रेल्वे स्थानकांमध्ये सुरु केली जाईल. मात्र सध्या तरी रेल्वेने बुक करण्यात येणाऱ्या सामानाचे वजन व त्याच्या शुल्काबाबत काही माहिती दिली नाही. परंतु यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल असा विश्वास आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now