Babri Masjid Demolition Case: बाबरी मशीद प्रकरणी 30 सप्टेंबर रोजी येणार अंतिम निर्णय; अडवाणी, उमा भारती यांंसह 32 आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
बाबरी मशीद (Babri Masjid) तोडल्याच्या प्रकरण संबंधित फौजदारी खटल्याचा अंतिम निर्णय विशेष CBI कोर्टातर्फे 30 सप्टेंबर रोजी निकाल सुनावण्यात येणार आहे.
बाबरी मशीद (Babri Masjid) तोडल्याच्या प्रकरण संबंधित फौजदारी खटल्याचा अंतिम निर्णय विशेष CBI कोर्टातर्फे 30 सप्टेंबर रोजी निकाल सुनावण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) हा खटला पूर्ण करुन निकाल देण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली होती. निर्णयाच्या सुनावणीच्या वेळी ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) , तसेच मुरली मनोहर जोशी ( Murali Manohar Joshi) आणि उमा भारती (Uma Bharati) यांच्यासह सर्व 32 आरोपींना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. अयोध्या राम मंंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) बाबत निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद पाडणे हे बेकायदेशीरच होते असे स्पष्ट केले होते तसेच मंंदिरासोबतच मशिदीच्या बांधकामासाठी पर्यायी जागेचा भूखंड ताब्यात घेण्याचे निर्देश सरकारला दिले होते.
या खटल्याबाबत कारवाई सुरु असताना 2 जुलै रोजी उमा भारती यांंनी तर अडवाणींनी 24 जुलै रोजी विशेष सीबीआय न्यायाधीश एस.के. यादव यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपले निवेदन नोंदवले होते, अडवाणी यांंनी बाबरी मशीद तोडल्याच्या घटनेत आपली भूमिका नव्हती असे सांंगितले होते तर भारती यांंनी “जर मला दोषी ठरवुन फाशी दिली तर मी धन्य होईन. मी जिथे जन्मले होते त्या ठिकाणी जाईन याचा मला आनंद आहे,” अशी प्रतिक्रिया दिली होती. भाजपचे माजी अध्यक्ष जोशी यांनी 23 जुलै रोजी आपले निवेदन नोंदवले होते. सुनावणीच्या काळात गिरीराज किशोर, विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल आणि विष्णू हरी डालमिया या तिन्ही आरोपींंचा मृत्यू झाल्याने त्यांंच्यावरील कारवाई बरखास्त करण्यात आली आहे.
पहा ट्विट
दरम्यान, अयोध्या राम मंंदिर आणि बाबरी मशीद या वादात सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये ऐतिहासिक असा निर्णय देत राम मंदिर बांधण्यासाठी अयोध्येतील वादग्रस्त जमीन सरकारच्या न्यासावर सोपविली जाईल असे सांंगितले होते, यानुसार मंंदिराच्या बांंधकामासाठी ट्रस्ट स्थापन करुन बांंधकाम सुरु करण्यात आले आहे. 5 ऑगस्ट रोजी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंच्या हस्ते भुमीपुजन व शिलान्यास कार्यक्रम पार पडला होता.
उत्तर प्रदेशमधील अयोध्येत असलेल्या बाबरी मशिद 6 डिसेंबर 1992 रोजी हिंदुत्ववादी हल्लेखोरांंनी पाडली होती असे हे एकुण प्रकरण आहे. याठिकाणी रामाचे जन्मस्थान असुन इथे राम मंंदिर बांंधले जावे असे या हल्ल्यामागचे उद्दिष्ट होते. हा एक ऐतिहासिक खटला म्हणुन पाहिला जातो.