Ram Mandir Bhumi Pujan: श्रीराम मंदिर हे भारतीय संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी
अशी भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
अयोद्धेमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे भूमिपुजन आणि शिलान्यास कार्यक्रम पार पडला. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र टृस्टच्या कार्यक्रमातून नरेंद्र मोदींनी जगभरातील राम भक्तांना संबोधित केले. यावेळेस श्रीरामाचा जप करत त्यांनी भाषणाला सुरूवात केली. आज या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणं हा अभिमानास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोट्यावधी लोकांची प्रतिक्षा आता संपली आहे. 'राम सबमे है आणि राम सबके है' म्हणत त्यांनी एकात्मतेचा नारा दिला आहे. Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न; चांदीची वीट रचून मोदींनी केली रामजन्मभूमीची पायाभरणी.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांच्या पिढ्या चळवळीमध्ये गेल्या आहेत. त्याचाप्रमाणे राम जन्मभूमीसाठीदेखील अनेकांच्या पिढ्या झिजल्या आहेत. श्रीरामाचं मंदिर हे संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेलअसा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असेल. राम मंदिर हे आस्था, संकल्पाची प्रेरणा देणारं आहे. रामाने जसे 'मर्यादा' पाळल्या होत्या तशाच आजही व्यवहारामध्ये तशाच मर्यादा जोडल्या आहे.
ANI Tweet
श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर निर्माण होत असल्याने संकटाच्या चक्रव्युहामधून पुन्हा श्रीरामाची सुटका झाली आहे. राम मंदिर म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही निर्मिती एक ऐतिहासिक घटना आहे. भारतासोबतच चीन, थायलंड, कंबोडिया मध्येही राम आढळतो असे सांगितले आहे. जम्मू कश्मिर पासून दक्षिण भारतामध्ये रामाची वेगवेगळी चरित्रं पूजली जातात.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र टृस्टच्या कार्यक्रमामध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या. तसेच संत महंतांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये श्रीराम जन्मभूमी विशेष पोस्ट स्टॅम्प चं अनावरण करण्यात आले आहे.