अयोध्येतील मस्जिदला मिळाले पहिले दान, हिंदूंकडून दिले गेले 21 हजार रुपये
हिंदू-मुस्लिम यांच्यामधील बंधुभाव कायम राखत उत्तर प्रदेशातील अयोघ्या जिल्ह्यात एक मस्जिद निर्माण करण्यासंबंधित हिंदूंकडून दान देण्यात आले आहे. लखनौ महाविद्यापीठाचे विधा संकायचे सदस्य रोहित श्रीवास्तव यांनी धनीपुर गावात मस्जिदीसाठी 21 हजार रुपयांचे दान दिले आहे. त्यामुळे मस्जिद ट्रस्टचे सचिव अतहर हुसैन यांनी त्यांचे कौतुक केले आहे.(Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न; चांदीची वीट रचून मोदींनी केली रामजन्मभूमीची पायाभरणी)
हुसैन यांनी असे म्हटले आहे की, मस्जिदीच्या निर्माणासाठी पहिले योगदान हे हिंदूंकडून आले आहे. जे भारतीय संस्कृतिचे एक अनुकरणीय आणि हृदयस्पर्शी करणारे उदाहरण आहे. पाच एकर जमिनीवर मस्जिद, पुस्तकालय, संग्रहालय आणि सामुदायिक भोजनालय निर्माण करण्यासाठी सुन्नी वफ्फ बोर्डाकडून गठित इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने एका कोषाची स्थापना केली आहे. श्रीवास्तव यांनी असे म्हटले आहे की, मी अशी एक पीढी आहे जी, समकालिकतेच्या भावनेवर विश्वास ठेवते. ज्यामध्ये धर्माबद्दलचे अडथळे अंधुक होतात.(Ayodhya Ram Mandir: अयोध्या नगरीत पितृ पक्ष संंपताच सुरु होणार राम मंंदिर बांंधकाम)
मी माझ्या मुस्लिम मित्रांशिवाय होळी किंवा दिवाळी साजरी करत नाही. तसेच ते माझ्या शिवाय ईद ही साजरा करत नाही. ही भारतातील करोडो हिंदू आणि मुस्लिमांची कथा आहे. मी हिंदू समुदायातील सदस्यांना अपली करतो की, त्यांनी पुढे यावे आणि मस्जिदी संदर्भात ते आपले बंधूच आहेत असा संदेश द्यावा. जिल्हा प्रशासनाने बाबरी मस्जिद ऐवजी ऑगस्ट महिन्यात वफ्फ बोर्डाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पाच एकर जमीन दिली. फेब्रुवारी 2020, मध्ये उत्तर प्रदेशातील सरकारने राम जन्मभूमी परिसरात जवळजवळ 25 किमी दूर फैजाबाद येथील सदर तहसीलात जागा देण्याची घोषणा केली होती.