Ayodhya Deepotsav 2023: अयोद्धा नगरी दीपोत्सवामध्ये 51 घाट 24लाख दिव्यांनी झगमगणार; Guinness World Record ची उत्सुकता
त्यांच्या सहभागाने आज रामनगरी सजणार आहे.
अयोद्धानगरी दीपोत्सवासाठी (Ayodhya Deepotsav) सजली आहे. दिवाळीनिमित्त रामनगरी अयोद्धा मध्ये 24 लाख दिव्यांनी 51 घाट उजळून निघणार आहेत. दिवाळीच्या दिवसात श्रीराम जन्मभूमी पथ (Shri Ram Janmabhoomi Path) हा विविध प्रकारच्या फुलांच्या आणि दिव्यांच्या रोषणाईने झगमत असतो. यंदाच्या दीपोत्सवाची देखील मोठ्या धामधूमीत तयारी सुरू आहे.
24 लाख दिव्यांसोबतच उत्तर प्रदेश सरकार कडून या दीपोत्सवामध्ये Guinness World Record केला जाणार आहे. झारखंड सह आजूबाजूच्या अनेक ग्रामीण भागातूनही नागरिक या दीपोत्सवामध्ये आपलं योगदान देणार आहेत. झारखंड च्या Pakur मध्ये कडेकपारी राहणारी लोकं अनवाणी आयोद्धा नगरीमध्ये पोहचली आहे. Jharkhand Pradesh Shri Ram Janaki Charitable Service Trust कडून या लोकांची यूपी मध्ये सोय केली जात आहेत. Javed Akhtar says Jai Siya Ram: 'प्रभू राम-सीता केवळ हिंदुंचे नाहीत'; राज ठाकरे यांच्या दीपोत्सव कार्यक्रमात जावेद अख्तर यांच्याकडून 'जय सीयाराम' घोषणा (Watch Video) .
अयोद्धे मधील दीपोत्सवाचे इथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग
अयोद्धा दीपोत्सव तयारी
दिवाळीच्या अर्थात नरक चतुर्दशीच्या दिवशीच्या पूर्व संध्येला आज (11 नोव्हेंबर) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमध्ये ही मंडळी दिवे लावणार आहेत. Pakur मधून पहिल्यांदाच ग्रामीण भागातील हे नागरिक यूपी मध्ये येणार आहेत. यापूर्वी संथाली जमातीमधील नागरिकांनी अयोद्धेमध्ये दिवाळी अनुभवली होती.