Auction of PM Narendra Modi Mementos: पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव; बनारस घाटाच्या पेंटिंगला सर्वाधिक बोली, जाणून घ्या कधीपर्यंत व कुठे होऊ शकता सहभागी

पंतप्रधानांच्या भेटवस्तूंच्या लिलावाची ही पाचवी फेरी आहे, असेही त्या म्हणाल्या. या वेळी केंद्रीय मंत्री लेखी यांनी लिलावासाठी ठेवलेल्या अशा अनेक भेटवस्तूंकडे लोकांचे लक्ष वेधले ज्या सामान्य दिसत असतील, तर अतिशय दुर्मिळ आहेत.

PM Modi | Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावामध्ये सामील होण्यासाठी गेल्या वेळीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने खरेदीदार पुढे आले आहेत. 2 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या सुमारे 912 भेटवस्तूंच्या या लिलावात आतापर्यंत सुमारे 16 हजार लोकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे. अशा स्थितीत या शेवटच्या दिवसांमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

भेटवस्तूंच्या या ऑनलाइन लिलावात बनारसच्या घाटांच्या एका महाकाय पेंटिंगला सर्वाधिक किंमत प्राप्त झाली असून, ती 74.50 लाख रुपयांवर पोहोचली आहे. त्याची किमान किंमत 64.80 लाख रुपये ठेवण्यात आली होती. यासोबतच ज्या कलाकृती आणि भेटवस्तूंसाठी आतापर्यंत सर्वाधिक बोली लावण्यात आली आहे, त्यात लक्ष्मी नारायण सोबत रुक्मिणीच्या मूर्तीचाही समावेश आहे.

केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी सोमवारी (23 ऑक्टोबर) पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंच्या ई-लिलावाची माहिती दिली. पंतप्रधानांच्या भेटवस्तूंच्या लिलावाची ही पाचवी फेरी आहे, असेही त्या म्हणाल्या. या वेळी केंद्रीय मंत्री लेखी यांनी लिलावासाठी ठेवलेल्या अशा अनेक भेटवस्तूंकडे लोकांचे लक्ष वेधले ज्या सामान्य दिसत असतील, तर अतिशय दुर्मिळ आहेत. यामध्ये गोंड चित्रकला आणि चंबा रुमाल इत्यादींचा समावेश आहे. (हेही वाचा: DA Hike For Rail Employees: रेल्वेच्या कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ; दसरा झाला गोड)

पंतप्रधानांच्या भेटवस्तूंमधून मिळालेली ही रक्कम गंगा स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या मिशन नमामि गंगे मोहिमेसाठी दान करण्यात आली आहे. तुम्हालाही पीएम मोदींच्या भेटवस्तूंच्या लिलावात सहभागी व्हायचे असेल, तर तुम्ही www.pmmementos.gov.in या वेबसाइटद्वारे बोलीमध्ये सहभागी होऊ शकता. पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्याची प्रक्रिया 2019 पासून सुरू झाली. त्यावेळी 1,089 भेटवस्तूंचा लिलाव झाला होता. यानंतर 2020 मध्ये 2772, 2021 मध्ये 1348 आणि 2022 मध्ये 1200 भेटवस्तूंचा लिलाव झाला.