Atma Nirbhar Bharat Abhiyan: कृषी क्षेत्रासाठी एक लाख कोटी रुपये देणार केंद्र सरकार- अर्थमंत्री निर्मला सीतारमण
तसेच, या पॅकेजमधील सर्वात मोठा हिस्सा हा कृषी विभागासाठी असणार आहे, असेही सीतारमण म्हणाल्या. निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद अद्यापही सुरुच आहे.
केंद्र सरकार द्वारा 'आत्मनिर्भर भआरत अभियान' (Atma Nirbhar Bharat Abhiyan) अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज सलग दिसऱ्यांदा माहिती देत आहेत. या पॅकेजबाबत सीतारमण यांनी काल आणि परवा असे सलग दोन दिवस माहिती दिली आहे. आजच्या परत्रकार परिषदेत सीतारमण यांनी देशातील कृषी, मत्स्य उद्योगासाठी सरकार विषेश सहाय्य करणार असल्याचे सांगितले. तसेच, या पॅकेजमधील सर्वात मोठा हिस्सा हा कृषी विभागासाठी असणार आहे. त्यानुसार कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकार एक लाख कोटी रुपये देणार असल्याचेही सीतारमण म्हणाल्या.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, मी आज ११ उपाययोजना जाहीर करीत आहे. त्याचा देशाच्या पायाभूत सुविधा, क्षमता आणि चांगल्या उत्पादन निर्मितीशी संबंध आहे. तर भाग शासन व प्रशासकीय सुधारणांशी संबंधीत आहे.
ट्विट
लॉकडाउन कालावधीत किमान समर्थन मूल्य खरेदी 74,300 कोटी पेक्षा जास्त रकमेची झाली आहे. पंतप्रधान किसान निधी योजनेंतर्गत तब्बल 18700 कोटी रुपयांचे हस्तांतरण करण्यात आले. COVID19 कोरोना व्हायरस संकटात सरकारने कृषी क्षेत्रासाठी विशेष आर्थिक पावले टाकल्याचेही अर्थमंत्री सीतारामण म्हणाल्या. (हेही वाचा, One Nation One Ration Card: देशभरातील सुमारे 67 कोटी जनता येणार 'वन नेशन - वन राशन कार्ड' कक्षेत)
ट्विट
ट्विट
कोरोना व्हायरस लॉकडाउन कालावधीत दुधाची मागणी 20-25% घटली आहे. त्यामुळे सन 2020-21 या आर्थिक वर्षात दुग्ध सहकारी संस्थांना वार्षिक 2% दराने व्याज सवलत देण्याची नवीन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतून 5000 कोटी रुपयांची अतिरिक्त लिव्किडिटी देण्यात येईल. ज्याचा 2 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल असेही सीतारमण यांनी सांगितले.