Atma Nirbhar Bharat Abhiyan: केंद्र सरकार मजुरांना 2 महिने देणार मोफत राशन; कार्डची आवश्यकता नाही

ही योजना कार्यन्वीत करण्यासाठी 2021 हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या योजनेचा लाभ देशभरातील सुमारे 67 लाख मजूरांना मिळेल असा विश्वासही सीतारमण यांनी व्यक्त केला.

Nirmala Sitharaman | (Photo credits: ANI)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज (गुरुवार, 14 मे 2020) आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या 20 लोख कोटी रुपयांच्या पॅकेजची विस्तारीत माहिती दुसऱ्या टप्प्यात दिली. सीतारमण यांनी सांगितले की, केंद्र सरकारने स्थलांतरीत कामगार, रस्त्याकडेला हातगाडी लावणारे किंवा छोटा व्यवसाय करणारे, छोटे व्यापारी, छोटे शेतकरी यांच्यासाठी विशेष योजना तयार केली आहे. त्यानुसार केंद्र सरकार लगातार काम करत आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत 25 लाख नवे शेतकरी क्रेडीट कार्ड देण्यात आले आहेत. त्यातून 3 कोटी शेतकऱ्यांपर्यंत मदत करण्यात आली आहे. कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी 63 लाख रुपयांचे कर्ज शेती क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय छोट्या शेतकऱ्यांना व्यजदरात सवलत देण्यात आली आहे. ही सवलत 31 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.

पुढचे 2 महिने सर्व मजूरांना अन्न मिळणार आहे. ज्या मजुरांकडे राशन कार्ड नसेल त्यांनाही 5 किलो गहू, 1 किलो चना मिळणार आहे. तब्बल 8 कोटी मजूरांना याचा फायदा होईल. सरकार त्यासाठी 2500 कोटी रुपये खर्च करेन. केंद्र सरकार खर्च करेन आणि ही योजना राज्य सरकार मजूरांपर्यंत पोहोचवेन. (हेही वाचा, Atma Nirbhar Bharat Abhiyan: शेल्टर होममध्ये बेघर लोकांना मिळणार 3 वेळचे अन्न- अर्थमंत्री निर्मला सीतारमण)

एएनआय ट्विट

दरम्यान, वन नेशन वन राशन कार्ड ही योजनाही सुरु करण्यात येईल. ही योजना कार्यन्वीत करण्यासाठी 2021 हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या योजनेचा लाभ देशभरातील सुमारे 67 लाख मजूरांना मिळेल असा विश्वासही सीतारमण यांनी व्यक्त केला.