Atique Ahmed Guilty: उमेश पाल प्रकण नेमके आहे काय? ज्यामध्ये अतिक अहमद ठरला दोषी?

2006 मध्ये माजी आमदार राजू पाल यांच्या हत्येचा साक्षीदार उमेश पाल यांना धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप अतिक अहमदवर होता.

Atique Ahmed

Atique Ahmed Guilty:  उमेश पालच्या अपहरण प्रकरणात (Umesh Pal Murder Case) माफिया अतिक अहमद (Atique Ahmed) आणि त्याचा भाऊ अश्रफ यांना मोठा झटका बसला आहे. 17 वर्षे जुन्या प्रकरणात, प्रयागराजच्या विशेष न्यायालयाने अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ आणि इतर आरोपींना दोषी ठरवले आहे. अतिकला IPC कलम 364-A अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.  2006 मध्ये माजी आमदार राजू पाल यांच्या हत्येचा साक्षीदार उमेश पाल यांना धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप अतिक अहमदवर होता. यापूर्वी उमेश पाल यांचीही प्रयागराजमध्ये भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अतिक हाही आरोपी आहे.

2004 मध्ये राजू पाल, त्यांची पत्नी पूजा पाल आणि उमेश पाल बसपमध्ये होते. अतीक अहमद आणि त्यांचा भाऊ अश्रफ समाजवादी पक्षामध्ये होते. राजू पाल यांनी बसपकडून तिकीट मिळवण्यासाठी अतीक अहमद आणि त्यांच्या कटुंबाविरुद्ध जोरदार प्रचार केला होता.  अलाहाबाद पश्चिम मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर अतीक अहमद यांचे धाकटे भाऊ अश्रफ यांना उमेदवारी देण्यात आली. राजू पाल यांना बसपकडून तिकीट मिळालं व त्यांनी अश्रफ यांना हरवून आमदार झाले. या पराभवामुळे दुखावलेल्या अहमद कुटुंबीयांनी राजू पाल यांची हत्या केली.

त्याचवेळी या खटल्याचा निकाल येण्यापूर्वी उमेशची आई शांती देवी यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. उमेशच्या आईने सांगितले की, माझ्या मुलाने खूप संघर्ष केला आहे. जेल हे त्याचे (अतीक अहमद) घर आहे आणि तिथून तो काहीही करू शकतो.

निकाल येण्यापूर्वी उमेशची पत्नी जया यांनी माध्यमांसमोर रडत रडत सांगितले की, मूळ कारण संपेपर्यंत काहीही शक्य होणार नाही. आम्ही भीतीच्या छायेत जगत आहोत, अशा परिस्थितीत अतिकसह सर्वांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now