Atiq Ahmed Life Imprisonment: अतिक अहमद याला जन्मठेप आणि 5,000 रुपयांचा दंड; प्रयागराज येथील कोर्टाचा उमेश पाल प्रकरणात निकाल

प्रयागराज येथील एका कोर्टाने ही शिक्षा ठोठावली.

Atiq Ahmed (Photo Credit : Twitter)

उत्तर प्रदेश राज्यात गाजलेल्या उमेश पाल अपहरण (Umesh Pal Kidnapping Case ) आणि हत्या प्रकरणात अतिक अहमद (Atiq Ahmed) याला जन्मठेप आणि 5000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रयागराज येथील एका कोर्टाने ही शिक्षा ठोठावली. दरम्यन, या प्रकरणात सहआरोपी असलेला अतिक याचा भाऊ अश्रफ आणि इतर सात आरोपींची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अतिक अहमद हा स्थानिक माफीया होता. माफीया राजमधून त्याने राजकारणात प्रवेश केला.

बसपा आमदार राजू पाल यांची 25 जानेवारी 2005 रोजी हत्या झाली .या हत्येनंतर तत्कालीन जिल्हा पंचायत सदस्य उमेश पाल यांनी पोलिसांना सांगितले की, तो हत्येचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. उमेशने 28 फेब्रुवारी 2006 रोजी अतिक अहमदच्या दबावापुढे झुकण्यास नकार दिल्याने त्याचे अपहरण झाल्याचा आरोप होता. या प्रकरणी 5 जुलै 2007 रोजी अतिक, त्याचा भाऊ अश्रफ आणि चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात 11 आरोपींचा उल्लेख आहे. (हेही वाचा, Atique Ahmed Guilty: उमेश पाल प्रकण नेमके आहे काय? ज्यामध्ये अतिक अहमद ठरला दोषी?)

अतिक अहमद हा समाजवादी पक्षाचा माजी खासदार आहे. तो फूलपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आला होता. तो (आतिक) कारागृहात असताना त्याच्यावर रिअल इस्टेट व्यावसायिक मोहित जैस्वाल यांचे अपहरण करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप झाला. त्यानंतर त्याला जून 2019 मध्ये गुजरातच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात स्थानांतरित करण्यात आले. अतिक अहमद याच्यावर उमेश पाल हत्या प्रकरणासह इतर प्रकरणांमध्ये 100 हून अधिक गुन्हे नोंद आहेत.

ट्विट

दरम्यान, जुलै 2020 पासून बरेली कारागृहात असलेल्या अतिक आशरफ याला कडेकोट बंदोबस्तात पोलिसानी नैनी मध्यवर्थी कारागृहात आणण्यात आले. त्याच्यासोबतचे पोलीस पथक सोमवारी सकाळी बरेलीहून प्रयागराजला रवाना झाले, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif