Assembly Election Results 2021: तामिळनाडू सत्ता परिवर्तनाच्या मार्गावर; DMK 151 जागांवर आघाडीवर, Edappadi K. Palaniswami यांना पराभवाचा धक्का?
गेल्या काही आठवड्यांमध्ये देशात 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2021) पार पडल्या. याधीची देशातील भाजपची (BJP) लाट आणि त्यानंतर उद्भवलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभुमीवर या निवडणुका अतिशय महत्वाच्या समजल्या जात होत्या.
गेल्या काही आठवड्यांमध्ये देशात 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2021) पार पडल्या. याधीची देशातील भाजपची (BJP) लाट आणि त्यानंतर उद्भवलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभुमीवर या निवडणुका अतिशय महत्वाच्या समजल्या जात होत्या. पश्चिम बंगाल, केरळ, असम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी अशा पाचही ठिकाणांचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. तामिळनाडू (Tamil Nadu) बाबत बोलायचे झाले तर राज्यात सत्ता परिवर्तन होणार असल्याचे दिसत आहे. सध्या उदयनिधि स्टालिन यांचा द्रविड़ मुनेत्र कड़गम (Dravida Munnetra Kazhagam) पक्ष तब्बल 151 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
द्रमुकने सकाळपासून ज्या प्रकारे मुसंडी मारली आहे ते पाहता एडप्पादी के पलानीस्वामी (Edappadi K. Palaniswami) यांना पराभवाचा मोठा धक्का बसू शकतो. सध्या अन्नाद्रमुक (AIADMK) 82 जागांवर आघाडीवर आहे. तमिलनाडुमध्ये 6 एप्रिल रोजी विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. तमिलनाडुमध्ये अभिनेता कमल हासनच्या मक्कल निधी मय्यमसह चार युती रिंगणात आहेत, परंतु मुख्य स्पर्धा सत्ताधारी एआयएडीएमके आणि मुख्य विरोधी पक्ष द्रमुक यांच्यात आहे. सध्याच्या निकालावरून दिसत आहे की, 10 वर्षांनंतर डीएमके तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करणार आहे.
मुख्यमंत्री के. पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पन्नेरसेल्वम, द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन, त्यांचा मुलगा उदयनिधी स्टालिन, अम्मा मक्कल मुन्नेत्र कझगम प्रमुख टीटीव्ही दिनाकरण, एमएनएमचे हसन आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष एल. के. मुरुगन यांच्यासह सुमारे 4000 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 234 विधानसभा जागांवर निवडणुका घेण्यात आल्या आहेत. राज्यातील मोठे नेते जे. जयललिता आणि एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर राज्यातील ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. तामिळनाडूच्या या दोन करिष्माई मोठ्या नेत्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात बरेच बदल घडले आहेत. (हेही वाचा: Mamata Banerjee ने Nandigram मतदारसंघात Suvendu Adhikari यांच्याविरूध मिळवला 1200 मतांनी विजय)
सध्याच्या निकालावरून दिसत आहे की, तामिळनाडूमध्ये द्रमुक सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. कॉंग्रेसशी युती करणारे स्टालिन निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि युतीला त्याचा फायदा होताना दिसत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी जनतेची एमके स्टालिन यांना पहिली पसंती असल्याचे दिसत आहे. म्हणूनच तामिळनाडूमध्ये आता एआयडीएमकेसमोर सत्ता वाचवण्याचे नव्हे तर पक्षाचे अस्तित्व वाचवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)