IPL Auction 2025 Live

Assam-Mizoram Border Dispute: CM हिमंत बिस्वा सरमा यांच्या विरोधात FIR; मिझोराम सरकारच्या अधिकाऱ्यांची कारवाई

असम (Assam) आणि मिझोराम (Mizoram ) या पूर्वेकडील दोन राज्यांमध्ये सुरु असलेल्या सीमा वादातून (Assam-Mizoram Border Dispute) मिझोराम पोलिसांनी (Mizoram Police) असम राज्याचे मख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल केला आहे.

Himanta Biswa Sarma | (Photo Credit : Facebook)

असम (Assam) आणि मिझोराम (Mizoram ) या पूर्वेकडील दोन राज्यांमध्ये सुरु असलेल्या सीमा वादातून (Assam-Mizoram Border Dispute) मिझोराम पोलिसांनी (Mizoram Police) असम राज्याचे मख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल केला आहे. या प्रकरणात हिमंत बिस्वा सरमा सरकारच्या प्रशासनातील सहा प्रमुख अधिकाऱ्यांशिवाय सुमारे 200 अज्ञात पोलिस अधिकाऱ्यांवरही अशाच प्रकारची कारवाई केली आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल आहे त्यात एक पोलीस महानिरीक्षक (IG), एक पोलीस उप महानिरीक्षक (DIG) और एक पोलिस अधीक्षक (SP) दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय कछार जिल्हा उपायुक्तांचेही या गुन्ह्यात नाव आहे. प्रकरण मिजोरामच्या कोलासिब जिल्ह्यातील वैंरेंगटे पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. हे पोलीस स्टेशन असम राज्याच्या कछार सीमेनजीक आहे.

दरम्यान, या पूर्वी असम पोलिसांनी काही खासदारांसह मोजोरामच्या काही प्रमुख व्यक्तिमत्वांना नोटीस पाठवले होते. असम पोलीस हे नोटीस बजावण्यासाठी खासदारांच्या नवी दिल्ली येथील घरीही पोहोचले होते. दोन्ही राज्यांमध्ये पाठीमागील अनेक दशकांपासून सीमावाद आहे. त्यातून दोन्ही राज्यांमध्ये राजकीय संघर्ष नेहमीच पाहायला मिळाला आहे. मात्र, दोन आठवड्यात हा संघर्ष अधिक उफाळून आला. या असम राज्याचे सहा पोलीस कर्मचारी मारले गेले. अनेक जखमी झाले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हिसा भडकवल्याचा आरोप केला.  (हेही वाचा, Himanta Biswa Sarma: फरार आरोपींना पोलीसांनी गोळ्या घालाव्यात, असमचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचे धक्कादायक विधान)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केलेल्या अवाहनानंतर हिंसा घडलेल्या प्रदेशात तणावपूर्ण शांतता आहे. कंद्रीय रिजर्व्ह पोलीस बलाची सुरक्षा या भागात मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली आहे. ज्यात असम आणि मिझोरामच्या पोलिस दलामध्ये केंद्रीय सुरक्षा दलाच्या पाच तुकड्या (जवळपास 500 सैनिक) तैनात आहेत.