आसाम मध्ये कोरोना व्हायरस संबंधित नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कलाकारांनी रस्त्यावरील भिंतींवर रेखाटली चित्र, पहा फोटो
त्यामुळे येत्या 17 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे.
देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे येत्या 17 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. त्याचसोबत नागरिकांना लॉकडाउनमुळे घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधित रुग्णांवर अहोरात्र उपचार केले जात आहेत. तसेच पोलिसांकडून ही नागरिकांना घरीच थांबवण्याच्या सुचना वारंवार देण्यात येत आहेत. याच दरम्यान आता आसाम (Assam) मधील काही कलाकारांनी नागरिकांमध्ये कोरोना व्हायरस संबंधित जनजागृती करण्यासाठी रस्त्यांवरील भितींवर चित्र रेखाटली आहेत.
कलाकारांनी भितींवर कोरोना संबंधित जनजागृती करण्याच्या उद्देशाने चित्र काढली आहेत. प्रत्येक चित्रामधून कोरोनाशी सामना कशा पद्धतीने करावा हे दाखवून दिले आहे. तसेच काही ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनजागृती करण्याठी स्थानिक कलाकारांनी यम आणि रावणाची भुमिका साकारल्याचे दिसून आले होते. त्यामुळे नागरिकांनी आता तरी लॉकडाउनच्या नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा केली जात आहे. जर नागरिकांनी लॉकडाउनच्या विरोधात लढण्यासाठी घरातच थांबल्यास तो संपवण्यासाठी लवकरच यश येईल.(लॉक डाऊननंतर पुन्हा ऑफिसला जाण्याबाबत 95 टक्के लोक चिंतेत; 59 टक्के कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे आरोग्याची चिंता - FYI सर्वेक्षण)
दरम्यान, देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 52952 वर पोहचला आहे. तर 35902 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु असून 1783 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत 15267 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. विविध राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाउन संदर्भातील नियम शिथिल करण्यात आले आहेत.