Asia's 10 Most Polluted Cities: आशियातील 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 8 ठिकाणांचा समावेश; Gurugram अव्वल

नोव्हेंबरमध्ये हवामान बदलत असताना, वातावरणातील परिस्थिती उलट होते. थंड हवेमुळे प्रदूषक पृष्ठभागाजवळ अडकतात, ज्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढते.

File image of air pollution (Photo Credits: PTI)

भारतामध्ये हिवाळा सुरू होताच वायू प्रदूषणाची पातळीही (Air Pollution) वाढू लागली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये हवेची स्थिती अत्यंत वाईट आहे. अशा विषारी हवेमुळे लोकांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. आता वर्ल्ड एअर क्वालिटी इंडेक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आशियातील टॉप 10 प्रदूषित शहरांपैकी आठ शहरे भारतामधील आहेत. याउलट, आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम शहराने टॉप 10 सर्वोत्तम हवेच्या दर्जाच्या शहरांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

या यादीमध्ये गुरुग्रामचा पहिला नंबर लागतो. गुरुग्रामच्या सेक्टर-51 मध्ये आज सकाळी AQI पातळी 679 वर पोहोचली, जी सर्वोच्च आहे. त्यापाठोपाठ रेवाडी (AQI 543) आणि मुझफ्फरपूरजवळील धरुहेरा शहर (AQI 316) यांचा क्रमांक लागतो. पुढे लखनौ (AQI 298),  बेगुसराय, भोपाळ स्क्वेअर देवास, गुजरातच्या कल्याणचा खडकपारा, दर्शन नगर आणि छपरा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीतून राजधानी दिल्ली बाहेर पडण्यात यशस्वी ठरली आहे.

चीनमधील लुझौ येथील झियाओशिशांग बंदर (AQI 262) आणि उलानबाटार, मंगोलिया येथील बायनखोशू शहर यांचाही या यादीत समावेश आहे. CPCB नुसार, 0 ते 50 मधील AQI सर्वोत्कृष्ट मानला जातो, 51 ते 100 हा समाधानकारक श्रेणीत असतो. त्याचप्रमाणे, 101 ते 200 पर्यंतचा AQI मध्यम मानला जातो, 201 ते 300 खराब मानला जातो आणि 301 ते 400 पर्यंत खूप खराब मानला जातो. यासोबत 401 आणि 500 ​​मधील AQI गंभीर श्रेणीमध्ये मानला जातो, जिथे श्वास घेणेही कठीण असते.

जागतिक वायु गुणवत्ता निर्देशांक 2007 मध्ये सुरू झाला. याद्वारे नागरिकांना वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलण्यास प्रवृत्त केले जाते. दिवाळीच्या दिवशी दिल्ली-एनसीआरसह अनेक भारतीय शहरांमध्ये फटाके फोडणे, पराली जाळणे यामुळे वायू प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे आणि AQI वाढत आहे. (हेही वाचा: PM Modi At Ayodhya: दिपोत्सवासाठी पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल, 18 लाख पणत्या पेटवत होणार विश्वविक्रमाचे साक्षीदार)

दरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाने आयआयटीएम सिस्टम ऑफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग अँड रिसर्च (एसएएफएआर) चे प्रकल्प संचालक डॉ. बी.एस. मूर्ती यांना उद्धृत केले की, नोव्हेंबरमध्ये हवामान बदलत असताना, वातावरणातील परिस्थिती उलट होते. थंड हवेमुळे प्रदूषक पृष्ठभागाजवळ अडकतात, ज्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढते. वायू प्रदूषणामुळे नवजात बालकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की जगातील 90% पेक्षा जास्त मुले दररोज विषारी हवेचा श्वास घेतात आणि प्रदूषित हवेत श्वास घेतल्याने गर्भवती महिला वेळेपूर्वीच जन्म देतात. यामुळे मुलांच्या विकासात फरक पडतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now