Gyanvapi Row: ASI टीम ज्ञानव्यापी मशिद परिसरामध्ये चोख बंदोबस्तामध्ये Scientific Survey करण्यासाठी दाखल
सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेला हा सर्व्हे आज दुपारी 12 पर्यंत चालण्याची शक्यता आहे. यादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
अलहाबाद न्यायालयाने (Allahabad High Court) काल सुनावणी दरम्यान सायंटिफिक सर्व्हे करण्याला हिरवा कंदील दिल्यानंतर आज 4 ऑगस्ट दिवशी Archaeological Survey of India कडून ज्ञानव्यापी मशिद परिसरामध्ये (Gyanvapi Mosque Complex) Scientific Survey करण्याला सुरूवात झाली आहे. 17व्या शतकातील ही मशिद हिंदू मंदिरावर उभारली आहे का? याचं उत्तर यामधून शोधण्याचा प्रयत्न आहे. आज सकाळी 7 च्या सुमारास या सर्व्हेला सुरूवात करण्यात आली आहे.
ASI टीम मेंबर्स आणि हिंदू याचिकाकर्ते ज्ञानव्यापी मशिद परिसरामध्ये आले आहेत. त्यांच्या सोबतीला कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. Anjuman Intezamia Masjid committeeच्या सदस्यांनी या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकला आहे. नक्की वाचा: Gyanvapi Case: ज्ञानवापी प्रकरणी ASI सर्वेक्षणाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर मुस्लिम पक्षाने गाठले सर्वोच्च न्यायालय; हिंदू पक्षाने दाखल केला कॅव्हेट अर्ज .
अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाचे समर्थन केल्यानंतर आणि प्रस्तावित पाऊल "न्यायाच्या हितासाठी आवश्यक" आहे आणि दोन्ही बाजूंना फायदा होईल असा निर्णय दिल्यानंतर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. कायदेशीर वादात मुस्लिम बाजूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या Anjuman Intezamia Masjid committee ने वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर हा आदेश आला आहे.
Kashi Vishwanath temple च्या बाजूला ही ज्ञानव्यापी मशिद आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेला हा सर्व्हे आज दुपारी 12 पर्यंत चालण्याची शक्यता आहे. 41 जणांची टीम मशिदीमध्ये दाखल होत असताना कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.