असदुद्दीन ओवैसी कडून महाराष्ट्र आणि केरळ राज्यातील पूरग्रस्तांना प्रत्येकी 10 लाखाची मदत

केरळ आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आता प्रति 10 लाख रूपये मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. ही मदत आता थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली जाणार आहे.

Asaduddin Owaisi (Photo Credits-Twitter)

AIMIM चा प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केरळ (Keral) आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. केरळ आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आता प्रति 10 लाख रूपये मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. ही मदत आता थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये (CM Relief Fund Maharashtra) जमा केली जाणार आहे. Maharashtra Flood 2019: कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्तांना तुम्ही कशी मदत करू शकाल?

मागील आठवड्याभरापासून सोलापूर, सातरा, सांगली, पुणे आणि कोकणामध्ये तुफान पाऊस कोसळल्याने पूर परिस्थिती गंभीर झाली होती. सलग 10 दिवस अनेक गावांना अद्याप पूराच्या पाण्याचा वेढा आहे. महाराष्ट्रात पूरामध्ये 48 जणांचा जीव गेला आहे तर 3 जण बेपत्ता आहेत. केरळमधील पूरात 14 शहरांमध्ये 91 जणांनी आपला जीव गमावला आहे तर 59 जणं बेपत्ता आहेत. Maharashtra Floods: पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ घेणार 5 गावांना दत्तक

पूराच्या पाण्याचा निचरा होण्यास सुरूवात झाल्याने आता मदतकार्य आणि बचावकार्याचा वेग वाढला आहे. देशभरात कर्नाटक, गुजरात, केरळ या भागात पूरात अडकलेल्यांसाठी सैन्य आणि एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य हाती घेण्यात आलं आहे.  महाराष्ट्रामध्ये आता पूर ओसरल्यानंतर मदतीचा ओघ वाढला आहे. अनेक देवस्थानांसोबत, सामान्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांचा महिन्याभराचा पगार पूरग्रस्तांसाठी दान केला आहे.